Breaking News यवतमाळ सामाजिक

*गोदामातून उत्कृष्ट धान्याचाच पुरवठा, मग रेशनचे धान्य निकृष्ट कसे काय* ?   

 

रेशन दुकानातून निकृष्ट धान्याचे वितरण;

पॉस मशीन विनापावती व्यवहार

शासनाने गरिबांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. यातील सर्वांत महत्त्वाची योजना म्हणजे प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार धान्य मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत माल पोहोचण्यासाठी असलेली साखळी खीळ घालत असल्याचे संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. अतिशय निकृष्ट धान्य रेशन दुकानातून लाभार्थ्यांना दिले जात असल्याच्या सतत तक्रारी असताना एकही अधिकारी याकडे लक्ष देत नाही हे विशेष, जिल्हा व तालुक्यातील स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांकडून तक्रारी केल्या जात आहे. मात्र पुरवठा विभागाकडून याकडे दुर्लक्ष केली जात असल्याची खंतही लाभार्थ्यांनी व्यक्त केली. जणु काही पुरवठा विभागास काही घेणे देणेच नसल्या सारखे झाले आहे

सध्या शासनाकडून अन्न सुरक्षा योजना राबवली जात आहे. शालेय पोषण आहारासाठी धान्याचा पुरवठा केला जातो. यासाठी धान्य हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश आदी राज्यातून आयात केले जाते. हा माल रेल्वेतून उतरल्यानंतर शासनाच्या गोदामात ठेवला जातो. या मालाची वेळोवेळी तपासणी करण्यात येते.

गोदामात असलेला माल दर्जेदार असला, तरी प्रत्यक्षात राशन दुकानात पोहोचणाऱ्या, डाळ व गव्हासह तांदळांचा दर्जा अतिशय खराब असतो. शासकीय गोदामात असलेल्या धान्याची पुरवठा विभागाकडून अनेकदा तपासणी केली जाते.

तेथील माल प्रत्यक्ष रेशन दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकदारांकडे सोपवला जातो. वाहनात टाकलेल्या मालाची नियमित तपासणी होते. मात्र असे असतानाही त्यातील मालाला कुठे पाय फुटतात, हा प्रश्न अनुत्तरित आहे.चांगला माल व्यापाऱ्यांना देऊन निकृष्ट आणि दर्जाहीन माल गरिबांना पुरवला जातो का?

गरिबांना पुरवण्यात येणाऱ्या या स्वस्त धान्यात होणारी हेराफेरी थांबवण्याची गरज असल्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. पॉस मशीनद्वारे निघालेली पावती ग्राहकाला मिळत नसल्यामुळे विविध विषयाला पेव फुटले आहे. याकडे पुरवठा विभाग झोपेचं सोंग घेऊन असल्याने या कडे लक्षच देत नाही लक्ष द्यावे, अशी मागणी स्वस्त धान्याच्या ग्राहकांकडून केली जात आहे.

जेव्हा रेशन दुकानदारांना गोदामातून धान्याचा पुरवठा केला जातो, तो उत्कृष्ट धान्याचाच केला जातो, असे सांगण्यात येते परंतु येथून धान्य वितरीत झाल्यावर दुकानदार नागरिकांना कुठल्या दर्जाचे धान्य वितरीत करतात हे तपासणे महत्त्वाचे आहे का? गोडामामधूनच चांगल्या धान्याची विल्हेवाट लागल्या जाते! हि बाब गंभीर जरि असली तरी या विषयी अधिकारी गंभीर नाही. या विषयी तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असा कांगावा केल्या जाते असे पुरवठा विभागाचे सांगणे असेल तरी हे केवळ वरिष्ठांना व जनतेला दाखवण्या साठी अधिकाऱ्याचा गव गवा राहतो हे केवळ दिखावा करतात मात्र प्रत्यक्षात कार्यप्रणाली शून्य आहे

रेशन दुकानदारांना दर महिन्याला गोदामातून उत्कृष्ट दर्जाचाच रेशन मालं दिल्या जात असल्याचे सांगण्यात येते मात्र त्यांना तो मालच मिळत नाही जे धाण्य जनावरेही खात नाही त्या धान्याचा वाटप लाभार्थ्यांना केल्या जातो

गरजू लाभार्थींच्या पदरात पडते निकृष्ट दर्जाचे धान्य

दर महिन्याला राशन दुकानातून नागरिकांना राशन वितरीत करण्यात येते. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी राशन दुकानातून उत्कृष्ट दर्जाचे धान्य नागरिकांना मिळावे, याकरिता शासन प्रयत्न करीत असताना मात्र तालुक्यातील काही दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्य वितरीत करण्यात येत असून, पुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया स्वस्त रेशनचे लाभार्थ्यांनी सांगितले.

वैद्य मापन शास्त्र अतिशय जुन्या पद्धतीचे असून बऱ्याच ठिकाणी आपण शास्त्राचे पासिंग शासकीय पद्धतीने केले गेले नसून या बाबीकडे वैद्य मापन शास्त्र अधिकारी जाणुन बुजून दुर्लक्ष करीत आहे

Copyright ©