Breaking News यवतमाळ सामाजिक

*ग्रामीण पोलिसांनी जुगारअड्ड्यावर धाड*

 

यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी जुगार अडड्यावर टाकलेल्या धाडीत सहा जुगाऱ्यानवर कारवाई करून ४७२३४० रूपया चा मुद्देमाल जप्त करण्यात आला हि घटना पिंपरी वनपरिक्षेत्रात ( जांभुळणी ) येथे घडली या मध्ये अटक करण्यात आलेले आरोपी वशिम खान नजीर खान वय २७ रा. नेर, अंकुश संतोष कांबळे, वय २३,रा. घुयखेड, मंगेश सखाराम गावंडे वय २७ रा. भुलाई बोथ, नौशाद शेख निजाम वय १८ रा.नेर, रजनीकांत दिलीप खाडे वय ३१ रा. भुलाई बोथ,नितीन शंकर खडसे वय २६ रा.नेर. यांचे कडून नगदी १७३४० रोख,तर ४५५००० किंमतीचे वाहन जप्त केलें हि कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन करेवाड यांच्या मार्गर्शनाखाली पांडुरंग कावरासे, ज्ञानेश्वर मातकर, संजय राठोड व प्रदीप चव्हाण यांनी हि कारवाई केली यात आणखी यात आरोपी असुन ते पळून जाण्यास यशस्वी झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. लवकरच फरार असलेल्या आरोपींनी अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

Copyright ©