यवतमाळ सामाजिक

जाणुन घ्या *आजच्या जिल्ह्यातील महत्व पूर्ण घडामोडी*

 

________________________________

 

*एका मृत्युसह*

*जिल्ह्यात 71 जण नव बाधित 57 जण.कोरोनामुक्त*

 

*पीक कर्जदर ठरविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*

 

 

 

यवतमाळ, दि. 8 :

गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 71 जण नव्. बाधित.

*यवतमाळ शहरातील एकाचा मृतिव

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 57 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 8) एकूण 349 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 71 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 278 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 423 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13098 झाली आहे. 24 तासात 57 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12268 आहे. तर जिल्ह्यात एकूण 407 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 128150 नमुने पाठविले असून यापैकी 127556 प्राप्त तर 594 अप्राप्त आहेत. तसेच 114458 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

_____________________________

 

*पीक कर्जदर ठरविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*

 

 

*2021 – 22 मध्ये जिल्ह्याला 2397 कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट*

 

 

 

यवतमाळ, दि. 8 :

बँकेचे सन 2020-21 करीता खरीप, रब्बी, उन्हाळी व बागायती पिकांचे पीक कर्जदर तसेच पशुपालन व मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जदर ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक घेण्यात आली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, नाबार्डचे दीपक पेंदाम, डॉ. प्रमोद यादगिरवार आदी उपस्थित होते.

 

प्रत्येक पिकासाठी पीक पेरणीपासून ते पीक हाती येईपर्यंतचा उत्पादन खर्च व उत्पन्न तसेच उत्पादन झालेल्या पिकांची बाजार भावाप्रमाणे किंमत, कृषी विभागाने व कृषी विद्यापिठांनी दर्शविलेले उत्पादन खर्च व उत्पन्न या बाबींचा पीक कर्जदर ठरवितांना विचार करण्यात आला आहे. पीक कर्जदर किमान व कमाल या रेंजमध्ये प्रती एकरी ठरविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, हवामान, कोरडवाहू व ओलित क्षेत्र, शेतीची पारंपरिक व आधुनिक पध्दती याबाबींचासुध्दा विचार करण्यात आला आहे.

 

त्यानुसार तज्ज्ञ समितीने सन 2020-21 खरीप पिकांसाठी प्रति एकरी खालील दर निश्चित केले आहे. बीटी कापूस ओलित करीता किमान 22500 आणि कमाल 25000 रुपये, बीटी कापूस कोरडवाहूकरीता किमान 17800 आणि कमाल 20000, तूरकरीता किमान 22500 आणि कमाल 25000 रुपये, सोयाबीनकरीता किमान 17800 आणि कमाल 20000 रुपये पीक कर्जदर आहे. तर रब्बी पिकांमध्ये गहू आणि हरबरा ओलितकरीता किमान 15600 आणि कमाल 17800 रुपये, उन्हाळी पिकांमध्ये उन्हाळी भुईमुंग किमान 17800 आणि कमाल 22250 रुपये, उन्हाळी मुंग किमान 10680 आणि कमाल 12100, उन्हाळी तीळ किमान 9800 आणि कमाल 10700 दर ठरविण्यात आले आहे.

 

सोबतच पशुपालन आणि मत्स्यव्यवसायाकरीता खेळते भांडवली कर्जदर ठरविण्यात आले असून 10 आर. क्षेत्रफळ असलेल्या शेततळ्याकरीता 28750 रुपये, 20 आर. क्षेत्रफळ करीता 40250 आणि 40 आर. क्षेत्रफळ असलेल्या शेततळ्याकरीता 57500 रुपये, मासेमारीमध्ये एक हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या मोठ्या तलावाकरीता (एक युनिट) 86250 रुपये, नदी, तलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने 8625 रुपये ठरविण्यात आले आहे. पशुपालन अंतर्गत 1 म्हैस (1 युनिट) 20000 रुपये, 1 गाय (1 युनिट) करीता 15000 रुपये, कुक्कुटपालन अंतर्गत एक हजार बर्ड (1 युनिट) करीता 72500 रुपये आणि शेळीपालन अंतर्गत शेळ्या (10 अधिक 1)(1 युनिट) करीता 18000 ठरविण्यात आले आहे.

 

बैठकीला विविध विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी म्हणून चंदू चांदोरे, माणिक कदम, हेमंत ठाकरे आणि अरविंद भेंडे उपस्थित होते.

_____________________________

 

*2021 – 22 मध्ये जिल्ह्याला 2397 कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट*

 

नाबार्डची 4505.08 कोटी संभाव्य वार्षिक क्रेडिट योजना

 

यवतमाळ, दि. 8 :

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) द्वारे संभाव्य वार्षिक क्रेडिट योजना (पी.एल.पी.) 4505.08 कोटी रुपयांची आहे. यात जिल्ह्याला 2021-22 या वर्षात 2397.39 कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे.

 

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते वार्षिक क्रेडीट योजनेचे विमोचन करण्यात आले. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दिपक पेन्दाम, अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, जिल्हा सहकारी निबंधक रमेश कटके, वार्षिक क्रेडिट योजना 2021-22 (पी.एल.पी.) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी उत्पादनाचे संकलन वर आधारीत आहे.

 

नाबार्डने तयार केलेल्या पी.एल.पी. वर बँकासाठी वार्षिक क्रेडिट योजना व वास्तववादी धोरणात्मक योजना बनविले जातात. पी.एल.पी. अंदाजानुसार तांत्रिक व्यवहार्यता, पायाभूत सुविधा संसाधने, पीककर्ज, जीएलसी प्रवाह व इतर विकास निर्देशकांत उपलब्धता वर आधारीत आहेत. दरवर्षी संभाव्य ऋण आराखडा वर आधारीत जिल्ह्यातील सर्व बँकेचे वार्षिक लक्षांश निश्चित होत असतात. नाबार्डच्या संभाव्य ऋण आराखड्यात पिक कर्ज वाटपासाठी 2 हजार 397 कोटी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. यंदा यात 31 कोटीची वाढ करण्यात आली आहे.

 

नाबार्ड संभाव्य कर्ज आराखड्यानूसार वर्ष 2021-22 साठी 2 हजार 397 कोटी 39 लाख रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. तसेच शेतीमधील मुदत कर्जासाठी 643 कोटी 57 लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. पीक कर्जासह कृषी पायाभूत सुविधा, सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एम.एस.एम.ई.) शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज अक्षय ऊर्जा इत्यादी प्राथमिक क्षेत्रातील सर्व घटकाकरीता यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण 4 हजार 505 कोटी 8 लाख रुपयांचा कर्ज आराखडा तयार करण्यात आला आहे.

Copyright ©