महाराष्ट्र राजकीय

*सुरक्षा रक्षकांच्या उपोषणाला आमदार रवी राणा यांचा जाहीर पाठिंबा*

 

 

यवतमाळ/पांढरकवडा/करंजी :–

युवा स्वाभिमान पार्टी व युवा स्वाभिमान सुरक्षा रक्षक न्याय संघटने च्यावतीने आज दि 7/1/2021 रोजी आजाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या सुरक्षा रक्षक च्या उपोषणाला युवा स्वाभिमान पार्टी चे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार रवि राणा यांनी भेट देहून संघटनेच्या प्रलंबित मागन्या शासनदरबारी घेहू महाराष्ट्रतील सुरक्षा रक्षक यांना न्याय मिळवून देण्याचे पूर्णत्व पणे आश्वासन दिले या उपोषणात

महाराष्ट्र राज्यातील 15 जिल्हे सुरक्षा रक्षक मंडळ हे एकत्रित करून एकच महामंडळ तयार करणे व सुरक्षा रक्षकला खाकी वर्दी देण्यात यावी आणि PF हा PF खात्यात जमा करावा व करण्या सारख्या मागण्या व ईतर काही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आ रवी राणा यांनी दिले उपोषण स्थळी बोलत असताना मा कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन येणाऱ्या अधिवेशनाच्या आत मागण्या मान्य नाही केल्यात तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात आंदोलन करू अथवा आमरण उपोषण करू असे मा आमदार रवी राणा स्पष्ट केले महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षक उपस्थित होते

Copyright ©