महाराष्ट्र सामाजिक

*लवकरच गंगाजल द्वारे होणार कोरोणा बरा*

 

 

 

गंगाजल कोव्हिड-19 वर रामबाण उपाय आहे ?’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचा ‘सनातन संवाद’ !

लवकरच गंगाजलाद्वारे ‘कोव्हिड-19’ वर उपचार करणारे स्वस्त दरातील औषध उपलब्ध करण्याचा प्रयत्न ! – अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता

यवतमाळ- नुकत्याच बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील (BHU) डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनात पवित्र गंगा नदीच्या जलात आढळणारा बॅक्टेरियाफॉज नावाचा विषाणू हा कोरोना विषाणूला निष्क्रीय करून मारतो, असे लक्षात आले आहे. या विषयावरील शोधप्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध ‘हिंदवी (Hindawi) इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्याचे जगभरातील अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांनी अभ्यास करून कौतुक केले आहे. गंगोत्री येथील गंगाजलापासून बनवलेला ‘नोझल-स्प्रे’ हा कोरोनावर प्रभावी ठरला आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून (ICMR) अनुमती मिळाल्यावर लवकरच देशातील जनतेसाठी तो बाजारात आणला जाईल. त्याची 20 ते 35 रुपये इतकी कमी किंमत असल्याने तो गरीब व्यक्तीलाही परवडणारा असेल, तसेच हा कोरोनावरील अन्य लसींप्रमाणे अपायकारक आणि महाग नाही, असे प्रतिपादन गंगा नदीच्या बचावासाठी मोठे कार्य करणारे उत्तर प्रदेशातील उच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा न्यायमित्र अरुण कुमार गुप्ता यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गंगाजल कोव्हिड-19 वर रामबाण उपाय आहे ?’ या विषयावर ऑनलाईन आयोजित ‘सनातन संवादा’त ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी त्यांची मुलाखत घेतली. फेसबूक, ट्वीटर आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून हा कार्यक्रम 23 हजारांहून अधिक जणांनी हा कार्यक्रम पाहिला.

या वेळी अधिवक्ता गुप्ता पुढे म्हणाले, ‘‘भारतातील पवित्र गंगाजलात आढळणारा बॅक्टेरियाफॉज हा विषाणू अनेक आजार निर्माण करणार्‍या जिवाणूंंना मारतो, हे अनेकदा वैज्ञानिक संशोधनातून समोर आलेले आहे. त्यामुळे आम्ही ‘बनारस हिंदु विश्‍वविद्यालया’च्या डॉक्टरांच्या साहाय्याने कोरोनावर संशोधन केले. त्यात आम्हाला यश आले आहे. गंगास्नान तथा गंगा नदीचे माहात्म्य आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथात सांगितले आहेच. ते आता वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध होत असून ते समाजापर्यंत गेले पाहिजे. आज भारतीय सरकारी संस्था या संशोधनात साहाय्य न करता अडथळा आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे केंद्रशासनाने यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात भारतातील काही राज्यांत मृत्यूदर 40 ते 45 प्रतिशत असतांना गंगा नदीच्या किनारी राहणार्‍या गावांमध्ये मृत्यूचे प्रमाण 5 प्रतिशतपेक्षा कमी होते, तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक होते. हे सर्व सरकारी आकडे आहेत. गंगेच्या पाण्याच्या वापरामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने त्यांच्यावर कोरोनाचा प्रभाव होत नाही. माघमेळा तथा कुंभमेळ्याच्या वेळी 10 ते 12 कोटीच्या संख्येने लोक गंगास्नान करण्यासाठी एकत्र येतात. त्यात अनेकांना विविध प्रकारचे रोग वा चर्मरोग असतात; पण गंगास्नान केल्याने लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे संशोधनातून समोर आले आहे. गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांतील मूलभूत घटकद्रव्ये आणि ऑक्सिजन यांचे प्रमाण वैज्ञानिकदृष्ट्या भिन्न आहे; मात्र ज्या वेळी यमुना नदीचा मोठा प्रवाह छोट्याशा गंगा नदीच्या प्रवाहात प्रयाग येथे मिसळतो. तेव्हा यमुनेतील सर्व घटकद्रव्ये ही गंगेतील घटकद्रव्याप्रमाणे होतात; म्हणून तिला पुढे गंगा नदीच म्हटले जाते. अशा एकूण 300 नद्या गंगा नदीत येऊन मिसळतात’’.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©