Breaking News यवतमाळ सामाजिक

*खुलेआम रूम मध्ये घुसून चोरी*

 

यवतमाळ : ५

भांब ( राजा ) येथील वीजवितरण क. नीच्या ३३ केव्ही. उपकेंद्रात अज्ञात चोरांनी खुलेआम सांगुन चोरी केल्याचा प्रकार घडला येथील कर्मचारी मंगेश जगन्नाथ गुल्हाने वय ३५ रा. शिंदे नगर यवतमाळ व सुरक्षा रक्षक असताना अचानक रात्री १२.३० च्या दरम्यान अचानक विद्युत पुरवठा बंद झाला त्या मुळे हे दोघेही गेट जवळ आले असता चार इसम आले त्यांनी गुल्हणेला कंट्रोल रूम मध्ये घेऊन गेले तेथील जवळ असलेले ६००० रुपये त्यांनी घेतले व जातांना त्यांनी २०० केव्ही ए रेटीचा ट्रान्स फार्मर तोडून अडीच लाखाचे नुकसान करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद केले या वरून अज्ञात चोरण विरुद्ध ३८२,३४, १३९अन्वेय गुन्हा तर नोंद केला परंतु ग्रामीण पोलीस या अज्ञात चोरांचा शोध घेईल का असा सवाल करण्यात येत आहे..

Copyright ©