Breaking News यवतमाळ सामाजिक

*बोरीसिंह येथे हातभट्टी दारूवर धाड*

 

*53 हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना अटक , वडगाव पोलीसांची कारवाई*

 

वडगाव जंगल पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात बोरीसिंह शिवारात हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची माहिती ठाणेदार पवन राठोड यांना मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने धाड टाकून मोहामाच सह 53 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.यामध्ये तीन आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

ठाणेदार पवन राठोड यांनी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात रूजु होताच अवैध व्यवसायाविरूध्द मोहीम सुरू केली.

सोमवारी सायंकाळी बोरी सिंह शेत शिवारात येथे चालू गावठी रनींग हात भट्टी दारूवर सहा. पोलीस निरीक्षक पवन राठाेड, व पोलीस हवालदार भाऊराव बोकडे,पो.ना.धनंजय शेखदार,पो.कॅा. अक्षय डोंगरे, प्रेमानंद जेंगठे व पराग सहारे यांच्यासह धाड टाकली असता आरोपी विजय बाळु डफळे, पांडुरंग बापुराव मारुती, श्रीराम केवजी मेश्राम सर्व रा. रूई हे चालू गावठी हात भट्टी वर दारू गाळतांना मिळुन आले.या आरोपींच्या मुसक्या आवळुन त्यांचेकडुन घटना स्थळावरून ८० पीप्यांमध्ये ८०० लीटर सडवा मोहा माच किंमत ४०००० रूपये , ३ ड्रम मधे १८० लीटर सडवा मोहा माच किंमत ९००० रूपये , ३ डबक्यांमधे मध्ये ४० लीटर दारू किमत ४००० रूपये असा एकून ५३००० रूपयाचा मुद्देमाल मिळून आला. तीन आरोपीरूध्द कलम ६५ ई, फ महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गावागावात ग्रामपंचायत निवडणूका सुरू असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये म्हणून हातभट्टी, देशी दारूवर अशाच प्रकारे धडक कार्यवाही सुरूच राहील अशी माहिती ठाणेदार पवन राठोड यांनी देशोन्नती ला दिली.

Copyright ©