यवतमाळ सामाजिक

*दिव्य दृष्टी अपंग विकास संस्थेच्या वतिने लुई ब्रेल जयंतीनिमित्त दिव्यांगाना साहित्य वाटप.*

 

 

यवतमाळ दि. ४

. -:यवतमाळ येथील दिव्य दृष्टी अपंग विकास संस्थेच्या वतिने ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीचे व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले.या जयंती निमीत्त संपुर्ण जिल्ह्यातील दिव्यांग बंध-भगिनींना काठी वाटप,कपडे,ब्लँकेट,तसेच मास्कचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन भावे मंगल कार्यालय सिव्हील लाईन येथे आयोजन केले आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.विजय अग्रवाल आरोग्य अधिकारी नगरपरिषद यवतमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून अजयसिंग गहरवाल कार्यालय अधिक्षक न.प.यवतमाळ,शरद मन्नरवार,शैलेश गाडेकर,रेखा रणदिवे,जितेंद्र सहारे,यांचे उपस्थितीत दिव्यांगाना साहित्य वाटप करण्यात आले.दरवर्षी प्रमाणे दिव्य दृष्टी अपंग विकास संस्थेच्या वतिने दिव्यांगासाठी विवीध उपक्रम राबविल्या जात असुन काही दानशुर व्यक्तींच्या योगदान महत्त्वाचे आहे. लुई ब्रेल (४ जानेवारी  १८०९ – जानेवारी ६ १८५२) हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसीत केली. लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात,गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला.त्यांनी दिव्यांगासाठी अंध व्यक्तींसाठी बोटाच्या सहाय्याने वाचनाची ब्रेल लिपी तयार केल्याने त्यांना ब्रेल लिपीचे जनक सुध्दा संबोधले जाते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिव्य दृष्टी अपंग विकास संस्थेचे अध्यक्ष दिपक मोरघडे,सचिव संगिता कासार,उपाध्यक्ष सुरेश बटे,कोषाध्यक्ष प्रेमा पत्रावार,सुकांत वंजारी,हिरामण दिवेकर,गोपाल नगराळे आदी उपस्थित होते.

Copyright ©