Breaking News यवतमाळ राजकीय

*गावकऱ्याच्या एकमतानुसार निर्णय*  *तालुक्यातील आणखी दोन ग्रामपंचायत अविरोध*

 

 

सोनूर्ली सिंगलदीप येथील ग्रामपंचायत दुसऱ्यांदा अविरोध

 

 

………….. …………………..

गावकऱ्याच्या एकमतानुसार निर्णय

तालुक्यातील आणखी दोन ग्रामपंचायत अविरोध

 

:–पांढरकवडा तालुक्यातील दहेली तांडा ही ग्रामपंचायत अविरोधी निवणून आले त्यातच आणखी दोन ग्रामपंचायत अविरोध निवडून आल्या असता सोनूर्ली ग्रामपंचायत ही सुद्धा दुसऱ्यांदा अविरोध निवडून आले व सिंगलदीप ही ग्राम पंचायत सुद्धा अविरोध निवड झाली गटातटाच्या राजकारणामुळे विकासाला बाधा निर्माण होतो, गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेवत गावकऱ्याच्या एकमता मुळे तालुक्यातून पांढरकवडा आणखी दोन ग्रामपंचायत अविरोध निवड झाल्याने सर्व स्तरातुन सोनूर्ली व सिंगलदीप वासियांचे कौतुक होत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर महाराष्ट्रातील अनेक आमदार यांनी ग्रामपंचायत अविरोध करा व अमुक अमुक लाखाचा निधी मिळवा ही विकासात्मक घोषणा करून निवडणुक विभाग व उमेदवाराचा वेळ , पैसा, कष्ट वाचविण्याचा विधायक प्रयत्न केला, सोनूर्ली व सिंगलदीप वासियांनी गावाचा विकास समोर ठेऊन कुठल्याही गटातटाला थारा न देता सोनूर्ली व सिंगलदीप ग्रामवासियांचे ग्रामपंचायत अविरोध करण्यावर एकमत झाले, नंतर ठरलेल्या सदस्या नी ग्रामपंचायत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले,

यांच्या विरोधात कुणीही नामनिर्देशन पत्र न भरल्याने ही सदस्य अविरोध निवडून आले, ग्रामपंचायत अविरोध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य निमिष मानकर यांच्या सह अनेकांनी ग्रामपंचायत अविरोध करण्यावर भर दिला.

Copyright ©