Breaking News यवतमाळ राजकीय शैक्षणिक सामाजिक

*जिल्ह्यातील महत्व पुर्ण घडामोडी* *जिल्ह्यातील एकाचा मृतिसह ४७ नव बाधित, तर ४० जनाची मुक्तता* २) *शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा आढावा* ३) *नेहरू स्टेडियम येथे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र व क्रिकेट स्पोर्ट नर्सरी सुरू* ४) *जिल्हा स्तरीय युवा कार्यक्रमाचे आयोजन* ५) *यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मधील पदाधिकारी यांची निवड*

 

____________________________

*जिल्ह्यात एका मृत्युसह 47 जण नव्याने पॉझेटिव्ह*

 

*40 जण कोरोनामुक्त*

यवतमाळ, दि. 4 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 47 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये कळंब तालुक्यातील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 40 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 4) एकूण 247 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 47 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 200 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 367 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12856 झाली आहे. 24 तासात 40 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12086 आहे. तर जिल्ह्यात एकूण 403 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 126411 नमुने पाठविले असून यापैकी 125866 प्राप्त तर 545 अप्राप्त आहेत. तसेच 113010 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे

____________________________

*शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा*

यवतमाळ, दि. 4 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्य अध्यक्षेतेखाली जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आढावा

गुडधे, अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, पशुसवंर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. बी. आर. रामटेके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.

यावेळी एकूण सहा प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात यवतमाळ तालुक्यातील टेंभुर्णी येथील अनिता छगन राठोड, मारेगाव तालुक्यातील केगाव येथील अखिल नथ्थू कनाके, मारेगाव तालुक्यातील देवाळा येथील मारोती माधव बोढे, मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील अरुण भाऊराव मानुसमारे, कळंब तालुक्यातील पिंपळगाव येथील फकरू चिंधुजी शिंदे आणि परसोडी येथील रविकांत साहेबराव जगताप या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा समावेश होता.

आढावा घेण्यात आलेल्या कुटुंबियांना शेतामध्ये नरेगा अंतर्गत विहिरी, तसेच काही कुटुंबांना शेतात पंप, जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत काही कुटुंबाना लाभ देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना यावेळी दिल्या.

बैठकीला बैठकीला संबंधित गावांचे तलाठी, पोलिस पाटील, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते

______________________________

*नेहरू स्टेडीयम येथे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र व क्रिकेट स्पोर्टस नर्सरी सुरु*

यवतमाळ, दि. 04 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने नेहरू स्टेडीयम, गोधणी रोड येथे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र तथा क्रिकेट स्पोर्टस नर्सरी सुरु झाली आहे.

क्रिकेट प्रशिक्षण दरम्यान मुलांना विविध मनोरंजक खेळाद्वारे शारिरीक क्षमता, वेग, ताकद, दम, लवचिकता, चपळता, समन्वय वाढविण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम प्रकार घेण्यात येतील. तसेच प्रशिक्षण केंद्राकरीता क्रीडा विभागामार्फत क्रिकेटचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच बॅटींग, बॉलींग, फिल्डींग,‍ विकेट किपींग आदी कौशल्य विविध ड्रीलद्वारे शिकविण्यात येईल.

क्रिकेट प्रशिक्षणासाठी मुला मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. मुलामुलींचे वय 6 ते 14 वर्ष इतके असावे. प्रशिक्षणाच्या वेळा सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 आहे. प्रशिक्षण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यायालातील कार्यरत राज्य क्रिकेट मार्गदर्शक सचिंद्र मिलमिले यांचेद्वारे देण्यात येणार आहे. तरी शाळेतील / महाविद्यालयातील व खेळाची आवड असणारे होतकरू खेळाडूंनी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरीता सचिंद्र मिलमिले (क्रिकेट) यांच्याशी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक अ. समद यांनी केले आहे.

____________________________

*जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन*

यवतमाळ, दि. 04 : नेहरू युवा केंद्र व जिल्हास्तरीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात ऑनलाईनच्या माध्यमातून घेण्यात आला. यात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 भारतातील शिक्षणाचे परिवर्तन करेल, नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था अनलॉक करणे, झिरो बजट, नॅचरल फार्मिंग हे शेतकऱ्यांसाठी वरदान, उन्नत भारत अभियान’ हे जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे विषय होते.

 

भाषण स्पर्धेत प्रितम सराज याने जिल्ह्यातून प्रथम तर लोकेश मालखेडे यांनी द्वितीय क्रमांक पटकविला. स्पर्धेचे निवडकर्ते म्हणून अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक अंजली दिवाकर, सेवानिवृत्त प्राध्यापिका कल्पना देशमुख, सहाय्यक प्राध्यापक संदीप नगराळे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक सारंग मेश्राम यांच्यासह अमोलकचंद विधी महाविद्यालय येथील प्राध्यापक हजर होते. सदर स्पर्धेत 33 प्रतिस्पर्धी सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी अनिल ढेंगे, सुमंत मलंगुरकर योगीराज पवार, केशव कनवाळे, अरविंद शेंडे, संगम वाघमारे, पूजा मते, सुभाष गिरी यांनी सहकार्य केले.

____________________________

*यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मधील पदाधिकारी यांची निवड*

अध्यक्ष पदी

*श्री टिकाराम कोंगरे (काँग्रेस)*

दोन उपाध्यक्ष देण्यात आले

उपाध्यक्ष पदी

*1) वसंतराव घुईखेडकर (राष्ट्रवादी)*

*2) संजय देरकर (शिवसेना)*

 

महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज या वेळी उपस्थित होते

Copyright ©