यवतमाळ राजकीय

*शिक्षकांची राजकीय खेळीने दुभंगली ग्रा. प. निवडणुक अविरोध* 

महागाव/उमरखेड

प्रशांत देशमुख

+918767794577

 

डोंगरगाव ग्रामपंचायत अविरोध करण्यासाठी सत्ताधारी व एका शिक्षकाच्या पडद्यामागील राजकिय खेळी च्या धोरणामुळे जनतेची निराशा

 

महागाव – तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत चा आतापर्यंतचा कार्यकाळ लक्षात घेता सर्वसामान्य जनतेतून नाराजीचा सुर उमटत होता या वेळेस ग्रामपंचायत अविरोध होईल अशी आशा आम जनतेच्या विचारात होती पण डोंगरगावातील एका शिक्षकी पेशा असलेल्या व्यक्तीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शासकीय जाचक अटी असल्याने पडद्यामागे राजकारण करून उमेदवार रिंगणात उतरवले आहेत डोंगरगाव ग्रामपंचायत अकरा सदस्या च्या निवडीसाठी 35 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत गावातील सत्ताधारी व शिक्षकी पेशा असलेल्या व्यक्तीवर आम जनतेचा नाराजीचा सूर उमटत असून हे बाहेर गावी राहून गावातील राजकीय घडामोडी करीत असल्यामुळे आम जनता आता लोकशाही मार्गाच्या विचाराधीन झाली आहे त्यामुळे यांची आता पायाखालची माती घसरली असून वार्ड क्रमांक एक मधील जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने त्यांना तिथे एकही उमेदवार न मिळाल्यामुळे वार्ड क्रमांक एक मधील दाखल झालेल्या दोन उमेदवारी अर्ज अविरोध ठरले आहेत व वार्ड क्रमांक दोन मधील एक जागा ही अविरोध झाली आहे त्यामुळे आता पडद्यामागे राहून राजकारण करत असलेल्या शिक्षकी पेशा व्यक्तीने मागील काही काळात एका विधि तज्ञाला सोबत घेऊन डोंगरगावातील शेतकऱ्यांच्या बुडीत क्षेत्राच्या जमिनीच्या केसेस लढऊन त्यांच्याकडील 50 टक्के माया स्वतःच्या घश्यात गोळा केली असल्याने डोंगरगावा सह परिसरातील शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे त्यामुळे आता या शिक्षकी पेशा असलेल्या व्यक्तीची राजकिय खेळी अडचणीत आली असल्याने आता या व्यक्तीने आपलेच उमेदवार अविरोध राहवे यासाठी लोकशाही मार्गाने रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना त्यांचे नामांकन मागे घेण्यासाठी मोठ्या मायेची लालच देऊन फर्मान सोडले असल्याची चर्चा गावभर पसरत आहे लोकशाही मार्गाने चालणारी जनता याला बळी पडत नसल्याने पडद्यामागील राजकारण करणारा व्यक्ती विविध करार नामे करून अडचणीत करण्याचा प्रयत्न करीत आहे पण डोंगरगावातील सर्वसामान्य जनता लोकशाही मार्गाने चालत असून येत्या काळात हुकूमशाही करणाऱ्याला ज्याची त्याला जागा दाखवून देणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे

Copyright ©