Breaking News यवतमाळ राजकीय

दहेली तांडा येथील ग्रामपंचायत चौऊथांदा अविरोध

………….. …………………..

गावकऱ्याच्या एकमतानुसार निर्णय

सभापती पंकज तोंडसाम यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अविरोधी आणण्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया सभापती यांनी दिली

………………………………..

तालुका प्रतिनिधी

सागर मुडे

 

यवतमाळ /पांढरकवडा ( करंजी ) १ ,

:– गटातटाच्या राजकारणामुळे विकासाला बाधा निर्माण होतो, गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेवत गावकऱ्याच्या एकमता मुळे तालुक्यातून मांगरूळही नऊ सदस्यीय ग्रामपंचायत अविरोध झाल्याने सर्व स्तरातुन दहेली तांडा वासियांचे कौतुक होत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर महाराष्ट्रातील अनेक आमदार यांनी ग्रामपंचायत अविरोध करा व अमुक अमुक लाखाचा निधी मिळवा ही विकासात्मक घोषणा करून निवडणुक विभाग व उमेदवाराचा वेळ , पैसा, कष्ट वाचविण्याचा विधायक प्रयत्न केला, दहेली तांडा वासियांनी गावाचा विकास समोर ठेऊन कुठल्याही गटातटाला थारा न देता दहेली तांडा ग्रामवासियांचे ग्रामपंचायत अविरोध करण्यावर एकमत झाले, नंतर ठरलेल्या नऊ ग्रामपंचायत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, यात सौ ललिता राठोड

सौ ललिता राठोड

सौ कविता जाधव

सौ मंगला कोरांगे

सौ रुपाली राठोड

नरेंद्र राठोड

शिवकेश चव्हाण

विजय राठोड

विजय चव्हाण

यांच्या विरोधात कुणीही नामनिर्देशन पत्र न भरल्याने नऊ ही सदस्य अविरोध निवडून आले, ग्रामपंचायत अविरोध करण्यासाठी पंचायत समितीचे विद्यमान सभापती पंकज तोडासांम मा तालुका प्रमुख तिरुपती कंदकुरीवार सुभाष राठोड माजी उपसभापती धनराज राठोड रामराव राठोड धनराज चव्हाण यांच्या सह अनेकांनी ग्रामपंचायत अविरोध करण्यावर भर दिला.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©