Breaking News महाराष्ट्र सामाजिक

*प्राव्हेट कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात लावण्यात येणाऱ्या नंबर प्लेट धोकादायक…*

 

प्रतिनिधी मुंबई – (ठाणे ०१ जानेवारी २०२१)-

लोकमान्य नगर ४ येथिल वस्तीत प्रत्येक घराच्या दरवाज्या वरती लावण्यात येणाऱ्या नंबर प्लेट बाबत दि.३१ डिसेंबर २०२० रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर, व लो.सा. नगर प्रभाग समिती कार्यालय येथे समाजसेवक विकास राऊत, सागर मानकर व मनोज यादव यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन द्याण्यात आले.

लोकमान्य नगर ४ मध्ये काही दिवसांपूर्वी डिजिटल सर्वे झाला असून प्रत्येक घरावर पिनकोड द्यारे नंबर प्लेट लावण्याचे काम शेल्टर असोशियट पुणे या कंपनी द्यारे सुरू आहे. या डिजिटल सर्वेचे नेमके स्वरूप काय आहे हा सर्वे नेमक्या कोणत्या कारणास्तव आहे या बाबत नागरिकांत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. अनेक चर्चा सुरू आहेत या सर्वे संबंधित ठा.म.पा. तर्फे कोणतीही अधिकृत माहिती असलेला माहिती फलक प्रभागात लावन्यात आलेला नाही किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी या बाबत माहिती नागरिकांना दिलेली नाही.

समाजसेवक विकास राऊत व समाजसेवक गणेश शेलार यांच्या मते लोकांच्या समस्या वाढण्याची शक्यता जास्त आहे. सणामध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने चोरीचे प्रकार, लोकसंख्या जास्त असल्याने बलात्कारासारखे प्रकार, अपहरणासारखे, गुन्हेगारीसारखे प्रमाण वाढण्याची भीती जास्त असल्याची माहिती समाजसेवक विकास राऊत व गणेश शेलार यांनी दिली सदर प्रकार हा ठाणे महापालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता करण्यात आली आहे. असा प्रकार ठाणे महापालिका क्षेत्रात पहिल्यांदाच घडला आहे नागरिकांनी घाबरून न जाता जे नंबर लावण्यात आले आहेत ते त्वरीत काढण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त नयना ससाणे व प्रभाग समिती अध्यक्षा आशा डोंगरे यांनी दिले आहेत

यावेळी स्थानिक जागृक नागरिक उदय पांडये, नितीन घोलप, बाळासाहेब मचले, सागर मानकर, मनोज यादव, विकास राऊत, गणेश शेलार, अविनाश यादव, हरिराम यादव, नंदकुमार यादव, माणिक कारांडे, डेरेक डीसोझा रविंद्र गुप्ता उपस्थित होते

आपल्या प्रभागातील कोणाच्या घरावर ही नंबर प्लेट लावली असेल तर ती त्वरित काढावी आणि कोणत्याही संस्थेला आपल्या घराची माहिती देऊ नका असे आवाहन समाजसेवक विकास राऊत व गणेश शेलार यांनी सर्व नागरिकांना केले आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©