यवतमाळ विदर्भ सामाजिक

*ग्राहक, सभासदांना नववर्षाची ७ टक्के लाभांश भेट- राजश्री पाटील*

*ग्राहक, सभासदांना नववर्षाची ७ टक्के लाभांश भेट- राजश्री पाटील*

____________________________

 

गोदावरी अर्बनवर आजवर ग्राहक, सभासद ठेवीदारांनी जो विश्वास टाकून सेवा करण्याची संधी दिली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी सर्व सभासदांना नववर्षाची भेट म्हणून ७ टक्के लाभांश जाहीर केला आहे. पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी त्या बोलत होत्या.

गोदावरी अर्बन पतसंस्थेची सन २०१९ -२०२० ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभासदांना सभेला पाचारण न करता ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात व तेलंगणा या पाचही राज्यातील . ठेवीदार, सभासद, पिग्मी एजंट, बँक मित्र , कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यात आले होते. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, सचिव रविंद्र रगटे, सर्वश्री संचालक साहेबराव मामिलवाड, प्रा. सुरेश कटकमवार, यशवंत सावंत , प्रसाद महल्ले, मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे आदी उपिस्थत होते .

 

यावेळी पुढे बोलतांना राजश्री पाटील यांनी गोदावरीच्या वाटचालीचा वृत्तांत व्यतीत केला त्या म्हणाल्या कि, आगामी चालू आर्थिक वर्षात आम्ही आमच्या सभासदांना ७ टक्के लाभांश जाहीर करत आहोत. सोबतच आदिवासी भागात हनी (मध) क्लस्टर, हळद उत्पादक क्षेत्रात हळदीचे क्लस्टर, तर ग्रामीण लाकूड कारागिरांना फ़र्निचर क्लस्टर निर्माण करण्यात येणार आहे. सर्व कर्जदारांना सुरक्षा कवच म्हणून विम्याची तरतूद आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा संचालक मंडळ, ग्राहक, सभासद, कर्मचाऱ्यांनी दिलेली साथ, आशीर्वाद, विश्वास, नियोजन, प्रतिसाद आणि अंमलबजावणी यामुळेच संस्थेची आजवरची वाटचाल यशस्वी झाली असून यापुढेही अशीच सोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वार्षीक सर्वसाधारण सभेत राजश्री पाटील यांनी सर्व ११ विषय मांडले त्याला सर्व उपस्थित सभासदांनी संमती दिली.

यावेळी बोलतांना खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, अत्यंत कमी कालावधीमध्ये गोदावरी अर्बनने उत्तुंग घोडदौड करत यशाचा टप्पा ओलांडला आहे . पाच राज्यामध्ये रुंदावलेली कार्यकक्षा आता आगामी काळात देशाच्या इतर राज्यात गोदावरी अर्बनच्या कार्यकक्षा रुंदावणार आहेत. केवळ शाखा सुरु करणे हा उद्देश नसून अत्याधुनिक तंत्रज्ञानसह सुविधा सभासद, ठेवीदारांना देण्याचा आमचा मानस आहे. तसेच हिंगोली, नांदेड, आणि परभणी जिल्ह्यातील हळद उत्पादनाची क्षमता लक्षात घेता हिंगोली मध्ये लवकरच हळदीचे क्लस्टर उभारण्यात येणार आहे. सर्व यंत्रणांनी सज्ज अशा स्वतंत्र इमारतीमध्ये गोदावरीचे मुख्यालय स्थलांतर होणार असून त्यांनतर आणखी दर्जेदार सुविधा देण्यास आम्ही सज्ज राहू असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

 

वार्षिक सर्वसाधारण सभेचे संचलन आणि आजवरच्या कार्याचा अहवाल व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी मांडला ते म्हणाले कि, गोदावरी अर्बन ग्राहकांना देत आलेल्या दर्जेदार सोयीयुक्त सुविधांमुळे सभासद, गुंतवणूक , ठेवी, कर्ज वितरण, भांडवल, निव्वळ नफा, राखीव व इतर निधी, यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.. मोबाईल बँकिंग, एटीएम सुविधा या त्याच सेवेची उदाहरणे आहेत. गोदावरीची आजवरची वाटचाल इतर सहकार क्षेत्राच्या तुलनेत नेत्रदीपक झाली आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर सहकार क्षेत्रात कार्याची दखल घेण्यात येऊन अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .असे म्हणत आजवरचा सर्व लेखा जोखा धनंजय तांबेकर यांनी मांडला. यासभेला ठेवीदार सभासद, बँक मित्र, पिग्मी एजन्ट , आणि हितचिंतक मोठ्या संख्येने *ऑनलाईन* उपस्थित होते.

Copyright ©