- आर्णी ३०
*शिक्षकांच्या समस्यांना न्याय हक्क देण्यासाठी तत्पर राहील, व त्यांच्या प्रत्येक समस्यांना वाचा फोडणार असे आव्हान आ. किरण सरनाईक यांनी कार्यक्रमास्तळी ते बोलत होते तर
*मानव विकास मिशन अंतर्गत हनिफ मास्टर ऊर्दू माध्यमिक शाळेत मुलींना 115 सायकलीचे वाटप करण्यात आले
आज स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या विकसित होत आहे। शहरी विध्यार्थ्याच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी विशेषतः अल्पसंख्यक शाळेच्या विद्यार्थी सुद्धा स्पर्धेत आपले स्थान कायम करुन पुढे जात आहे।याचा प्रत्यय या शाळेची विध्यार्थीनी कु. अरिबा तकदिस हिने दाखवुन दिला आहे तिने भारत सरकार च्या पेट्रोलियम मंत्रालय कडुन घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले होते आता दहावीच्या परिक्षेत सुद्धा तिने 99%4 टक्के गुण मिळवुन शिक्षकवृंदांचा,संस्थेचा नाव लौकीक केलं अश्या या गौरवास्पद कार्यक्रमाला मला आमंत्रित केले हे मी माझे भाग्यच समझतो।माझी उम्मेदवारी ही कुठल्याही पक्षाची वा जाति पातीची नसुन केवळ एक शिक्षक म्हणुन व त्याचा न्याय हक्काचा लढा उभारण्यासाठीची होती मी सदैव शैक्षणिक समस्यांना व शिक्षकांच्या समस्यांना न्याय हक्क देण्यासाठी तत्पर राहील असे शिक्षक आमदार ऍड किरण सरनाईक यांनी मानव विकास मिशन अंतर्गत ढाणकी येथिल हनिफ मास्टर ऊर्दू माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना देण्यात आलेल्या 115 सायकलीच्या वाटप कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सैयद मक्सुद अली पटेल, प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ .वक्कार अहमद रिसोड, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हयात खान पत्रकार नौशाद अली आदि उपस्थित होते।या वेळी शाळेतर्फे नवनिर्वाचित शिक्षक आमदार किरण सरनाईक यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला।पुढे बोलतांना सरनाईकांनी सांगितले की या आधीच्या लोकांनी काय केलं किंवा नाही केलं या खोलकर न जाता मी सभागृहात आपल्या समस्या मांडुन न्याय मिळवुन देण्यासाठी सदैव अग्रेसर राहील 2010 च्या जिआर नुसार सक्तीचे शिक्षण करण्यात आले होते ज्या मध्ये 06 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण करण्यात आले होते त्यामुळे समाजातील शेवटच्या माणसा पर्यंत शिक्षणाची ज्ञान गंगा दारोदारी पोहचली होती परंतु 2019 च्या नव्या धोरणानुसार मागेल त्याला शिक्षण संस्था,मागेल त्याला इंग्लिश मीडियम काॅन्वेंट देऊन धंडदांडग्यांना उपकृत केलं परिणामी शिक्षणाचा खाजगिकरण करुन शिक्षणाच्या आर्थिक बाजार मांडल्या जात आहे।ज्या मुळे दिवसेदिवस जि.प.न.प. व अल्पसंख्यक शाळा ओस पडत आहे।विना अनुदानित शाळांना अनुदानासाठी 15 20 वर्ष वाट पाहावी लागत आहे ज्यामुळे अनेक शिक्षकांना उपासमारीची वेळ येउन अनेक कुटुंब उध्दवस्त होन्याच्या मार्गावर आहे तर अनेक शिक्षक आत्महत्या करित आहे, वयाची पन्नाशी गाठुन ही अनुदान मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या शिक्षकांचा संसार उध्दवस्त झाले आहे या सर्व बाबीवर मी सभागृहात आवाज़ उठविणार तसेच विद्यार्थ्यांसाठी शुद्ध जल मिळावे म्हणुन या शाळेत सर्वात प्रथम वाटर फिल्टर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाचा संचालन जहीरोद्दीन यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सैयद आबीद यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.
Add Comment