यवतमाळ सामाजिक

*गरीबांचे दर्जेदार रेशन जाते काळ्या बाजारातगरीबांचे दर्जेदार रेशन काळ्या बाजारात पुरवठा विभागाचे अधीक्षकû-

 

——————————

पोफाळी प्रतिनिधी :-शासनातर्फ गरीबांसाठी विविध योजना राबविल्या जातात.यातील सर्वात महत्वाची धान्य योजना आहे.प्रत्येक कुटुबांला दर्जेदार धान्य मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असतात. मात्र प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यत माल पोहोचविण्यासाठी असलेली साखळी या प्रयत्नाला खीळ घालत असल्याचे दिसुन येते.अतिशय निकृष्ट धान्य रेशन दुकानातुन लाभार्थ्याला दिले जाते.दर्जेदार धान्य हे काळ्या बाजारात विकले जात आहे.

सध्या शासनाकडुन अन्न सुरक्षा योजना राबविली जात आहे.याशिवाय शालेय पोषण आहारासाठी धान्याचा पुरवठा केला जातो.यासाठी धान्य हरीयाणा,पंजाब,मध्यप्रदेश,आदी राज्यातुन आयात केले जाते.हा सर्व माल रेल्वेतुन उतरल्यानंतर शासनाच्या गोदामात ठेवला जातो. या मालाची वेळोवेळी तपासणी ही केली जाते गोदामात असलेला माल दर्जेदार असला तरी प्रत्यक्ष रेशन दुकानातील गहु आणी तांदुळ याचा दर्जा अतिशय खालावलेला असतो.गोदामात असलेला माल चांगला असताना रेशन दूकानातच सुमार कसा पोहोचतो हा प्रश्न अनूत्तरीत आहे.शासकीय गोदामात असलेल्या धान्याची जिल्हा पुरवठा विभागाकडुन अनेकदा तपासणी केली जाते तेथील माल प्रत्यक्ष रेशन दुकानापर्यत पोहोचविण्यासाठी वाहतुकदाराकडे सोपविला जातो. वाहनात टाकलेल्या मालाचीही तपासणी केली जाते. मग त्यातील मालाला कुठे पाय फुटतात हा प्रश्न अनूत्तरीत आहे.गोदामामध्ये दोन प्रकाराचा तांदुळ उतरतो त्यात ए.आणी बी असे दोन प्रकार असतात पुरवठा विभाग याचे नमुनेही जवळ ठेवतात परतु रेशन दुकानात हाच माल पोहोचला की नाही यांची खातरजमा केली जात नाही. याप्रकारातुनच दर्जेदार धान्य मालाचा काळा बाजार फोफावत चालला आहे. चांगला माल व्यापारी प्रतिष्ठानांना देउन निकृष्ट आःणि दर्जाहिन माल गरिबांना पुरविला जातो. हा प्रकार थांबविण्यासाठी काळा बाजार करणार्‍यांची साखळी तोडने महत्वाचे आहे.

Copyright ©