यवतमाळ सामाजिक

*आर्णी येथे मनुस्मृतीचे दहन*( भारतीय बौद्ध महासभा व रमाई महिला मंडळचा पुढाकार )

 

आर्णी :

चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पाया तसेच महिलांना व शूद्रांना गुलामगिरीच्या काळोखात ढकलणाऱ्या मनुस्मृतीचे दहन आर्णी येथील वैभवनगर स्थित उरुवेला बौद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभा व रमाई महिला मंडळ आर्णी यांच्या पुढाकारात करण्यात आले.

मनुस्मृतीच्या मानसिक गुलामगिरीच्या विळख्यात सापडलेल्या महिला व शूद्रांना बाहेर काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी सर्वात प्रथम मनुस्मृतीचे दहन केले. या क्रांतिकारी घटनेनंतर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन म्हणून पाळला जातो. मनूच्या विखारी विषमतावादी विचारांचे दरवर्षी दहन करण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा आर्णी व रमाई महिला मंडळ वैभव नगर आर्णी यांच्या पुढाकाराने वैभव नगर स्थित उरुवेला बौद्ध विहार येथे मनुस्मृती दहनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. सौरभ मनवर, समीक्षा कानंदे, गणेश हिरोळे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष नागोराव बन्सोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिलीप मनवर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालिनी भगत, पुष्पाताई देवस्थळे, सुनिता भवरे, धम्मज्योती मनवर, शिलाताई गवळे,कांताबाई स्थूल, दिपाली हिरोळे, पूनम पाटील,मीनाताई खरतडे, किरण भगत, मीनाताई भगत, उज्ज्वला देवतळे, प्राची खरात, श्रुतिका भगत, साची हिरोळे, सांची पाटील आदी रमाई महिला मंडळ व देवानंद भगत, विठ्ठल गवळे, देवेश खोब्रागडे, मंगेश पाटील, निलेश बनसोड, विशाल भवरे,सूरज भगत, राजरतन खरतडे, चेतन इंगळे, सुधाकर गवई,प्रथमेश मनवर, राहुल मनवर, रुद्र हिरोळे, प्रशिक मुनेश्वर, विशाल मुरादे, कमलेश खरतडे, क्षितिज भगत, सुजित पाटील, संदेश भगत आदी भारतीय बौद्ध महासभा आर्णीचे सदस्य उपस्थित होते.

Copyright ©