Breaking News यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यात 22 जण कोरोनामुक्त ; 29 नव्याने पॉझेटिव्ह*

 

यवतमाळ, दि. 26 :

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 22 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 29 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.26) एकूण 484 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 29 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 455 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 345 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12505 झाली आहे. 24 तासात 22 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11766 आहे. तर जिल्ह्यात एकूण 394 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 121778 नमुने पाठविले असून यापैकी 121212 प्राप्त तर 566 अप्राप्त आहेत. तसेच 108707 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Copyright ©