यवतमाळ सामाजिक

*बालसंस्कार वर्गात गीता जयंती उत्साहात साजरी*

 

विश्व मांगल्य सभे तर्फे नेहमीच अभिनव उपक्रम राबविण्यात येतात त्यापैकी एक म्हणजे बालसंस्कार सभा.. बालसंस्कार सभा अंतर्गत श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसरा अध्यायाचे प्रशिक्षण यवतमाळ येथील बालकांना नुकतेच देण्यात आले. संस्कारक्षम बालक हा उद्याचा सुजाण नागरिक होणार आणि त्याला घडविणे हे बाल संस्कार सभे चे उद्दिष्ट आहेआणि म्हणूनच ते उद्दिष्ट घेऊनच श्रीमद्भगवद्गीतेचे पठाण हा उपक्रम राबविला . या उपक्रमाचा सांगता सोहळा उत्साहात पार पडला. विदर्भ प्रांत संघटन मंत्री मा कु तेजसा ताई जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी मुलांना बालवयात श्रीमद्भगवद्गीतेचे पठण होणे किती महत्वाचेआणि आवश्यक आहे हे सुरेख उदाहरणे देऊन स्पष्ट केले. स्थानिक उपस्थिती मा प्रचिती ताई जोशी यांची लाभली. प्रशिक्षिका म्हणून कु भक्ती महेश जोशी यांनी बालगोपालांना गीतेच्या दुसऱ्या अध्यायची शिक्षा दिली. सोहळ्याची सुरुवात कु निलया अजनसरे हिच्या बालगीताने झाली तर समारोप चि श्रेयस दामले याच्या जायघोषाने झाला. यां सोहळ्याकरिता यवतमाळतील मुलं मुली भरपूर संख्येने उपस्थित होते. यां प्रशिक्षण वर्गात प्रामुख्याने कु लावण्या शैलेकर, कु आभा बापट, कु निलया सज्जनवार, चि अवधूत कोहळेकर कु रेवा पांडे, कु हेमाक्षी सरुळकर,यांनी गीता जयंती निमित्त श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे ऑडियो क्लिप

द्वारे व्हिडिओ करून अखिल भारतीय स्तरावर त्याचे सादरीकरण केले.हा संपूर्ण सोहळा आभासी पद्धतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे संचलन कु सई सज्जनवार हीने तिच्या सुमधुर वाणीतून सूत्रबद्ध पद्धतीने केले.तर प्रास्ताविक कार्यालयीन प्रमुख सौं कल्पना ति ढेंगे यांनी केले.मान्यवरांनी बाल गोपालांचें अभिनंदन करत त्यांना पुढील उपक्रमा बद्दल शुभेच्छा दिल्यात.नगर अध्यक्षा सौं शुभांगी पांडे आणि बाल सभा प्रमुख सौं निवेदिता बापट या सोहळ्यास उपस्थित होत्या . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विश्वमांगल्य सभेच्या संपूर्ण कार्यकारिणीने भरपूर कष्ट घेतले…….

Copyright ©