महाराष्ट्र राजकीय

*या सर्वांनी मिळून दिवा लावू या…..भांडुप व मुलुंड झाला अटमय*

 

 

२५ डिसेंबर – रोजी भांडुप विधानसभा व ईशान्य मुंबई जिल्हा विभागात माजी पंतप्रधान,भारतरत्न, युगपुरुष, स्व. श्री अटल बिहारी वाजपेयी जी यांची ९६ वी जयंती जन्मदिवस साजरा करण्यात आला, पूर्ण ईशान्य मुंबई जिल्हा विभाग अटलमय झाला होता, या विभागाचे लोकप्रिय खासदार मनोज कोटक याचा जन्मदिवस ही २५ डिसेंबर या दिवशी असतो.

भारतीय जनता पार्टी चे नेते आणि भारतीय राजनीतिचे पितामहा अटल बिहारी वाजपेयी जी याची जयंती आणि लोकप्रिय खासदार मनोज कोटक यांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून ईशान्य मुंबई जिल्हा मध्ये भाजपा व अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराचे मनोगत विभागातील संस्थांच्या मार्गदर्शना खाली लोकांन पर्यत पोचावेत यासाठी विभागात कार्यक्रमाचे आयोजन जयंती व मनोज कोटक याचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.

सकाळ १०वा. ते रात्री १० वाजे पर्यत भारतीय जनता पार्टी भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रविन दहितुले यांच्या सहयोगाने ड्रीम्स रेसिडेन्सी नाका याठिकाणी ईशान्य मुंबई खासदार मनोज कोटक यांच्या हाथे पुष्पांजली अर्पित शुभारंभ करत्यात आला त्या नंतर भांडुप लालाशेठ कंपाऊड, गाढव नाका याठिकाणी नागरिकांना कंबल वाटण्यात आले.

संध्याकाळी ५ वा. ते ८ वाजेपर्यंत अटल विचार मंच चे वरिष्ठ नेते माजी नगरसेवक पी.एस.पाण्डेय, जितेंद्र परब, संजीव सिंह, राजेद्र निषाद, आनंद दिक्षित, सौ दिक्षाताई भोजने, राधेश्याम यादव, दिनेश भोजने व संस्थेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती व खासदार मनोज कोटक यांच्या जन्मदिवस निमित्ताने अटलसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, मुलुंड विधानसभा याठिकाणी संध्याकाळी ६.०० ते रात्री १०. ०० वाजेपर्यंत साजरा करण्यात आला या वेळी खासदार मनोज कोटक यांना शुभेच्छा देण्याकरीता कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्याने संख्येने उपस्थिती होते.

भांडुप व मुलुंड विधानसभा विभागात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रविन दहितुले, मुलुंड विधानसभा अध्यक्ष मनिष तिवारी, अटल विचार मंच पी.एस.पाण्डेय, आनंद दिक्षित, संजिव सिंह, संदेश फाऊंडेशन संजय शर्मा, व सर्व विभागातील कार्यकर्ते याचे विभागातुन आभार मानले जात आहेत.

Copyright ©