यवतमाळ राजकीय सामाजिक

*शेकोटीचे कारण, तिथेच शिजते, ग्रामपंचायतीचे राजकारण*

 

सध्या ग्रामपंचायती च्या राजकारणात चांगलाच वेग आला आहे आणि वेवेगळ्या पार्टीच्या वेगवेगळ्या शेकोट्या पाहायला मिळत आहे हा प्रकार अनेक गावात दिसुन येत आहे ही शेकोटी त्यांची ती शेकोटी यांची असा सुर अनेकांच्या मुखामधून ऐकायला मिळत आहे तर काही ठिकाणी

गावमधील सुरू असलेल्या उलाढाली तर काही ठिकाणी पिकापाण्या बाबत तर काही शेकोट्या सोयरिक संदर्भात चर्चा रंगत आहे

 

!! सद्या कडाक्याच्या थंडीने उच्चांक गाठला असल्यानेअनेकांनी आपले ध्येय साधण्या करिता शेकोटीचा आधार घ्यायला थंडीचा मोठा आधार मिळाला आहे!!

वाढोना बाजार परिसरात गेल्या आठवड्यापासून बोचर्‍या थंडीचा कहर सुरू झाला असल्याने या थंडी पासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. याच काळात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण ग्रामीण भागात निर्माण झाल्याने शेकोटीच्या मदतीने गावातील घडामोडीचा लेखाजोखा घेतल्या जातो. आणि महत्वाचे म्हणजे पारंपरिक पारावरच्या गप्पांना उधाण आले आहे. त्यात शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू असल्याने शेतातील लाइट येत पर्यंत शेकोटीच्या माध्यमातून एक करमणुकीचे माध्यम खेडोपाड्यात निर्माण झालेल आहे….

Copyright ©