Breaking News राजकीय

*उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम या वेळी गृहीत धरणार…राज्य निवडणूक आयोगाची घोषणा*

 

मनसेचा दणका….ग्रामपंचायत निवडणुकी साठी उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम या वेळी गृहीत धरणार…राज्य निवडणूक आयोगाची घोषणा.

 

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप पाहता ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.परंतु ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक परिस्थितीअत्यंत वाईट आहेअश्या परिस्थितीत कोरोना सुरू होण्या अगोदर ग्रामपंचायत निवणुकीची तयारी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत उमेदवारांनी नामनिर्देशन मूल्य भरले आहे सोबत इतर कागदपत्रे तयार करण्यासाठी हजारो रुपये खर्च केला आहे.फक्त चिन्ह वाटप बाकी असतांना कोरोनाचा लॉक डाऊन सुरू झाला.अश्या परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात परिस्थिती पाहता ज्या उमेदवारांनी कोरोना पूर्वी नामनिर्देशन मूल्य भरले आहे त्यांना या निवडणुकीत तोच खर्च पुन्हा न करता माफ करण्यात यावा अथवा त्याची भरलेली रक्कम त्यांना परत करण्यात यावी.या मागणीचे निवेदन मनसेने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले होते.या निवेदनाची दखल घेत राज्य निडणुक आयोगाने संपूर्ण राज्यात ज्या उमेदवारांनी कोरोना पूर्वी आपले नामनिद्रेशन दाखल केले त्यांना या वेळी त्यांनी भरलेली रक्कम गृहित धरण्यात येणार असल्याची काल अखेर आदेश काढून घोषणा केली.यवतमाळ जिल्हा मनसेच्या दणक्याने संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून करोडो रुपये उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जमा केले होते.

 

कोरोना काळात शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य नागरिक फार संकटात आहे.अश्या परिस्थिती मनसेने केलेली मागणी ही सर्व ग्रामपंचायत उमेदवारांना दिलासा देणारी ठरली.मनसेच्या या मागणीची दखल घेतल्या बद्दल मनसेचे अनिल हमदापुरे यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आभार व्यक्त करत मनसे च्या मागणीमुळे ग्रामपंचायत उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असुन जनतेसाठी मनसे सदैव कटिबद्ध असल्याचे मत या निर्णयावर व्यक्त केले.

या निवेदनाद्वारे सर्व उमेदवारांची भरलेली रक्कम त्यांना आता परत भरण्याची गरज राहिली नाही.त्यासाठी त्यांना नामनिर्देशन पावती अथवा पुरावा सादर करावा लागणार आहे. मनसेच्या या मागणीसाठी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार ,अनिल हमदापुरे,सचिन एलगंधेवार ,विकास पवार,सादिक शेख,अमित बदनोरे,आकाश देशमुख, मुकुंद जोशी ,प्रशांत गौरकार यासह इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. या निर्णयासाठी अनेक ग्रामपंचायत उमेदवारांनी मनसेचे आभार व्यक्त केले आहे आणि सर्व सामान्य गावपातळी वरच्या विषयाला हात घालत ग्रामीण उमेदवारांचा विचार केल्यामुळे मनसेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे, जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©