Breaking News महाराष्ट्र सामाजिक

*विमानतळावर ५ लाख प्रवाशांचे परदेशातून आगमन*, *सात महिन्यांत दुबई, लंडनमधून सर्वाधिक प्रवासी*…..

विमानतळावर ५ लाख प्रवाशांचे परदेशातून आगमन,

सात महिन्यांत दुबई, लंडनमधून सर्वाधिक प्रवासी…..

 

मुंबई : गेल्या सात महिन्यांच्या करोनाकाळात मुंबई विमानतळावर ५ लाख ६ हजार प्रवाशांचे परदेशातून आगमन झाल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली.

यामध्ये दुबई आणि लंडन येथून आलेले आणि त्या ठिकाणी जाणारे सर्वाधिक प्रवासी आहेत.

यासाठी मुंबई विमानतळावर या प्रवाशांसाठी १२ हजार ५६० विमानांचे उड्डाण व आगमन झाले आहे.

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा अधिक चालवण्यात आल्या.

परदेशात करोनाचा हाहाकार होताच तेथील भारतीयही परतू लागले.

‘वंदे भारत’अंतर्गत विमान सेवाही चालवल्या.

मे महिन्यात १ हजार ६० विमान सेवातून १० हजार ३०० प्रवाशांचे आगमन व उड्डाण झाले, तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत हीच संख्या २ हजार ३०० विमानसेवा आणि १ लाख ४४ हजार ४०० प्रवाशी एवढी झाली.

करोनाकाळात नवीन २९ आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरही सेवा देण्यात आली.

यात लुसाका, मोम्बासा यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे.

दुबईसाठी सर्वाधिक २ लाख ६७ हजार ६०० प्रवाशांनी, तर त्यापाठोपाठ लंडन हीथ्रोसाठी ८९ हजार ८००, न्यूयॉर्कसाठी ८० हजार ८००, तर दोहासाठी ५८ हजार २०० आणि अबुधाबीसाठी ३९ हजार ४०० प्रवाशांनी उड्डाण व आगमन केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Copyright ©