यवतमाळ सामाजिक

*जवळ्यातील गरजू अतिक्रमण धारकांना घरकुल चा लाभ द्या* वार्ड नंबर 5 मधील जनतेची मागणी.

*जवळ्यातील गरजू अतिक्रमण धारकांना घरकुल चा लाभ द्या*

वार्ड नंबर 5 मधील जनतेची मागणी.

 

 

आर्णी पंचायत समिती अंतर्गत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रख्यात असलेले जवळा गाव आहे मात्र आमदार-खासदारांचे लोकप्रिय गाव असून सुद्धा या सर्व बड्या नेत्यांचे जवळा गावा कडे दुर्लक्ष होत आहे तरी त्यांनी या गावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जवळा गावांमधील प पत्र ब मधील जवळपास 118 घरकुल आलेले असून ते मात्र भू.गट नंबर दोन असल्यामुळे शासनाने प्रलंबित ठेवले आहे याकडे मात्र गावातील बड्या नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे काही घरकुल धारकांचे मत ऐकायला मिळत आहे त्याच प्रमाणे प्रपत्र ड यादीमधील जवळपास 132 घरकुल प्रतीक्षेत आहे.

घरकुल येईल माझे घर होईल या स्वप्नात वार्ड नंबर 5 मधील जनता आहे मात्र गावातील बड्या नेत्याकडून त्यांची आशाची निराशा होत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

वार्ड क्रमांक पाच मध्ये जवळपास वीस वर्षापासून नागरिक आपले कुडाचे घर बांधून वास्तव्य करीत आहे शासनाचे विविध कर जसे घर टॅक्स ,पाणी बिल, लाईट बिल हे सगळे भरत आहे व सर्वांना ग्रा,प चे टॅक्स पावत्या व 8अ असून सुद्धा घरकुलाचा लाभ मिळत नाही यात विशेष बाब म्हणजे 2014 च्या आधी याच वार्ड क्रमांक पाच मधील अतिक्रमण धारकांना घरकुल, स्वच्छालय हेही शासकीय मिळाले आहे तर मग उर्वरित नागरिकांना घरकुल का मिळत नाही हा एकच प्रश्न जवळा गावातील वार्ड क्रमांक पाच मधील जनतेत निर्माण झाला आहे.

गावातील सर्वोत्कृष्ट निर्णय हे ग्रामसभेमध्ये घेतल्या जातात व त्याच ग्रामसभेमध्ये वार्ड क्रमांक पाच मधील सर्व घरकुल धारक अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन वेथित करित आहे म्हणून सर्व लाभार्थ्यांना घरकुल मिळावे असा ठराव सुद्धा पारित झाला आहे तरीपण गरजू घरकुल धारक आपल्या स्वप्नातील घराच्या प्रतीक्षेत आहे हीच स्वप्न पूर्ण व्हावी सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा याकरिता जवळा गावातील पत्रकार गणेश धनोडे यांनी महिला मोर्चा आर्णी तहसील सुद्धा काढला त्याची प्रसिद्धी माध्यमांनी केली परंतु कुणीही या कडे लक्ष दिले नाही केवळ मतदाराच्या मतावर डल्ला मारत आपली पोळी शेकुन घेतली मात्र या वारडास विकासा पासुन कोसो दूरठेवले तरअध्याप घरकुल धारकांना घरकुलाचा लाभ दिला नाही त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याने विशेष लक्ष द्यावे ही जवळा गावातील नागरिकांची मागणी आहे.

 

घरकुल धारकांचा निर्णय शासन दरबारी प्रलंबित आहे.

 

जवळा गावातील अतिक्रमण धारकांचा मुद्दा हा जवळपास 2017 पासून प्रलंबित आहे आणि मी 2020 ला पंचायत समिती बांधकाम विभागाला रुजू झालो आहोत तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळताच जवळा गावातील अतिक्रमण धारकांचा प्रश्न मार्गी लावू असे .

पंचायत समिती बांधकाम विभाग अभियंता .

किशोर साबळे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले

Copyright ©