Breaking News यवतमाळ सामाजिक

*पोलीस गस्तीने जिरवली चोराची मस्ती*

दिनांक 23 डिसेंबर

पोलीस गस्तीने जिरवली चोराची मस्ती

रोजच पोलिसांची असते गावात गस्त म्हणुन सर्वसामान्य आहे स्वस्थ

रात्री तीन वाजता गस्त आर्णी पोलीस शहरात करीत असताना एक इसम त्याचे अस्तित्व
आपल्या डावात असलेला चोर अचानक पोलिसांची नजर त्याचेवर पडली तो चोरी करण्याच्या उद्देशानेच असावा असा निष्करषापर्यंत पोलीस पोहचली , त्यास पोलीस भासेत विचारपूस केली असता त्याचे जवळ एक विना क्रमांकाची मोटरसायकल हीरो होंडा कंपनी मिळून आली व सदर मोटर सायकल चे लॉक तुटलेले असल्याने त्यांनी सदर मोटरसायकल चोरी केल्याचा संशय आला तेथुन पोलिसांची चक्रे सुरू झाली त्या इसमासह मोटारसायकल ताब्यात घेऊन कलम 124 बीपी अँक्ट प्रमाणे कारवाई करून चौकशी सुरु करताच सदर मोटरसायकल शास्त्रीनगर येथून रात्री दरम्यान चोरी केल्याची कबुली इसमाने दिल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आनले व इतर गुन्ह्यात सहभाग बाबत सविस्तर विचारपूस केली असता कळंब चौक यवतमाळ येथून एक महिन्यापूर्वी एक मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले वरून सदर आरोपी नामे नितेश भीमराव नगराळे व वय 18 वर्ष राहणार धानोरा तालुका जिल्हा यवतमाळ हल्ली मुक्काम मुलकी यवतमाळ
त्याच्याकडून दोन हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल जप्त करण्यात आलेले आहेत व फिर्यादी चे रिपोर्ट वरून वरून कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन यवतमाळ शहर यांना माहिती देण्यात आलेली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदरशनाखाली
पोलीस नाईक मनोज चव्हाण ,अक्षय ठाकरे, मिथुन जाधव हे करीत आहे

Copyright ©