यवतमाळ राजकीय

*ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग*!!

वाढोना बाजार –

2020 डिसेंबर या कालावधीत मुदत संपण्याच्या तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या निवडणूक 15 जानेवारीला होत आहे. त्या साठी दिनांक 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या 5 वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला यामधील तालुक्यातील वाढोना बाजार, अंतरगाव, आपटी, चहांद, चिखली, गुजरि, धानोरा, लोहारा, निधा, पिंपळखुटी, पिंपरी दुर्ग, रावेरि, रामतीर्थ, येवती या अनेक ग्रामपंचायतीच्या समावेश असून अर्ज दाखल करन्यास 23 पासून सुरवात झाली याची 30 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. कोरोना काळातही निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत असून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत तर अनेक उत्साही उमेदवार रिंगणात उतरले….

Copyright ©