Breaking News महाराष्ट्र राजकीय

*कृषी कर्ज घोटाळा प्रकरणात रासप आमदाराला झटका, ‘गंगाखेड’ची 255 कोटी मालमत्ता जप्त*

 

मुंबई प्रतिनिधी

– परभणी, 24 डिसेंबर: सक्तवसुली संचालनालयाने (ED) परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने गंगाखेड शुगर अँड एनर्जी, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे. या कंपन्यांची परभणी, बीड आणि धुळे जिल्ह्यातील तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गंगाखेड येथील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांचा गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड हा साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी ED कडे तक्रार केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. या तीनही कंपन्यांविरोधात मनी लाँड्रिंग कायद्या अंतर्गत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

Copyright ©