यवतमाळ शैक्षणिक

*यंग इंडिया फोरम मार्फत मोफत महाविद्याल विद्यार्थ्यांन करिता कार्यशाळेचे आयोजन*

 

 

यवतमाळ: दि.22

यवतमाळ- सध्याच्या स्थितीत रोजगार हा मोठा प्रश्न सर्वच तरुणांवर आहे. कोरोनामुळे अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली आहे पण मात्र कोरोनाकाळात एकच क्षेत्र असे आहे की ज्यावर लॉकडाऊनचा विपरीत परिणाम न होता ते क्षेत्र दुपटीने वाढत राहिले ते म्हणजे आय-टी क्षेत्र. आय-टी क्षेत्रात नोकरी मिळावी असे बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाटते म्हणूनच आय-टी क्षेत्रात नोकरी कशी मिळवावी? इंजिनियरिंग वगळता बाकी पदवी शिक्षण घेणाऱ्यांनी आय-टी क्षेत्रात कसे शिरावे? आय-टी क्षेत्रात भविष्यात कशी संधी मिळू शकते?

कोणीही आय-टी क्षेत्रात येऊ शकते का? व आपल्या मनातील अनके प्रश्नांचे समाधान शोधण्यासाठी यंग इंडिया फोरम मार्फत मोफत कार्यशाळेचे आयोजन दिनांक २५ डिसेंम्बर दुपारी ०४:३० वाजता अवधूत व्यामशाळेचे मैदान अवधूतवाडी इथे करण्यात आले आहे.

या कार्यशाळेला आय-टी क्षेत्रातील अनुभवी व सेटट्राईब एम्प्लॉयबिलिटी सोल्युशन्स चे मॅनेजिंग डिरेक्टर श्री सारंग वाकोडीकर मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.

कोरोनाच्या नियमावली नुसार या कार्यशाळेला मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांनी यंग इंडिया फोरम च्या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवर दिलेल्या गुगल फॉर्म भरून आपले नाव नोंदवावे व आपली जागा निश्चित करावी व या मोफत कार्यशाळेचा लाभ घावा. असे आवाहन यंग इंडिया फोरमच्या वतीने सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

Copyright ©