यवतमाळ सामाजिक

बजरंग दल शाखा पारवा कडून हागंदारी मुक्त गावाची मोहीम सुरू.* *स्वच्छता अभियानास सुरुवात*!

 

———————————————————

पारवा प्रतिनिधी :-

बंजरग दलाच्या उपक्रमास सुरुवात करण्यात आली    स्वच्छता राखणे आणि निरोगी राहणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. व्यक्ती स्वच्छ आणि निरोगी असेल तरच स्वतःबरोबर समाजाचा पर्यायाने देशाचा विकास घडवून आणू शकतो. स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेऊन प्रत्येकाने संकल्प करणे गरजेचे आहे की देश आणि समाज, कुठेही कचरा आढळला तर मी तो स्वतः दूर करून तो परिसर स्वच्छ करून टाकेल. याचेच प्रत्यय म्हणून पारवा येथिल अलीकडेच बजरंग दल शाखा पारवा कडुन इंदिरानगर येथे हागंदारी मुक्त गावची मोहीम सुरू करण्यात आली. संपूर्ण परीसर स्वच्छ करून वार्डातील प्रत्येक लोकांना हागंदारीचे दुष्परिणाम सांगून जनजागृती कऱण्यात आली. यानंतर शौच्छस बसल्यास काही प्रमाणात दंड सुद्धा आकारण्याची मोहीम बजरंग दल शाखा पारवा यांनी हाती घेतली आहे. या उपक्रमात बजरंग दल च्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©