यवतमाळ सामाजिक

*लोनबेहळचा पेढा* ! *त्या शेतकऱ्याच्या आयुष्यातील कष्टाचा गोडवा* ! 

 

 

यवतमाळ : 20 डिसेंबर

 

आर्णी माहूर रोडवरील लोनबेहळ येथे एका पेढ्याच्या दुकाना जवळ अनेकांची वाहने थांबतात.. कारणही तसंच आहे.. त्या शेतकऱ्याने निर्माण केलेल्या पेढ्याचा ‘ गोडवा ‘ ! लोनबेहळ येथील जयंत साठे या शेतकऱ्याचा शेतीला जोडधंदा म्हणून पारंपरिक दुग्ध व्यवसाय आहे. विशेष म्हणजे आपल्या कौशल्याचा वापर करीत त्यांनी खास पेढा तयार केला. गत तीन वर्षांपूर्वी पेढा विक्रीला सुरुवात केली.  या ठिकाणी पाहता पाहता पेढ्याचा गोडवा सर्वदूर पसरला. अनेक प्रवाशी पेढ्याचा आस्वाद घेण्यासाठी न चुकता थांबतात. या व्यवसायात त्यांचं संपूर्ण कुटुंब खंबीरपणे साथ देत आहे. पेढ्या सोबत खवा,श्रीखंड,लोणी , बासुंदी तूप आदी पदार्थ तयार करून विकतात. त्या शेतकऱ्याच्या आयुष्यातील कष्टाचा ‘ गोडवा ‘ खरंच प्रेरणादायी आहे !

Copyright ©