यवतमाळ सामाजिक

*वणी परिसरात आढळून आला वाघोबा*

*वणी परिसरात आढळून आला वाघोबा…*

वणी शहरापासून काही कि.मी.च्या अंतरावर वाघोबाचे दर्शन नुकतेच घडुन *वणी परिसरात आढळून आला वाघोबा…*

*वणी जवळील गावाला सतर्क राहण्याचा वनविभागाचा ईशारा..*

वणी शहरापासून काही कि.मी.च्या अंतरावर वाघोबाचे दर्शन नुकतेच घडुन आले आहे.

त्यामुळे भालर जंगला नजिकच्या गावाला सतर्क राहण्याचा वनविभागाने ईशारा दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की,

काही दिवसा आधी भालर नजिक असलेल्या

कोळसा खानित एका वाघाचे दर्शन नुकतेच झाले होते. याची माहिती वनविभागाला मिळताच, वनविभागाने तातडीने पाऊल उचलून, उपाययोजना करायला सुरुवात केली होती. यामध्ये वन कर्मचारी यांनी गावोगावी जाऊन ,जनजागृती अभियान राबविण्यास सुरवात केली आहे . परंतु त्यांच्या या जनजागृतीला ग्रामीण जनता ,मनावर घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आणी वन कर्मचारी यांच्याशी वाद घालतांना दिसुन येत आहे. परंतु वाघाचा भालर,मंदर परिसरात असलेला वावर पाहता ..नागरिकांनी योग्य ते सहकार्य वनविभागाला करण्याचे आवाहन वन अधिकारी यांनी केले आहे.

हा वाघ नुकताच निलगिरीबनात असलेल्या तलावाजवळ आढळून आला असल्याचे वनविभागाचे अधिकारी सुनिल ताजने यांनी दै. देशोन्नतीला बोलतांना सांगितले.

वनविभागाडुन भालर – मंदर जंगलातील परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असुन ,

सध्या निलगिरीबन परिसरात वाघाचा वावर असल्याचे ट्रॅप कॅमेरा मध्ये आढळून आले असल्याचे ,वन विभागाकडुन बोलले जात आहे.

हा वाघ दर वर्षी भद्रावती जंगला कडुन ,भालर जंगलाकडे येत असतो.

परंतु या वाघोबाने यंदाजा मुक्काम वाढविल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे नागरिकांनी योग्य सहकार्य करावे ..असे वन विभागाकडून बोलले जात आहे.

गावातील लोकांनी जंगलात जाऊ नये , गुराखी यांनी जनावरे जंगलात घेऊन जाऊ नये ,आणी वनविभागाला योग्य सहकार्य करावे :— सुनिल ताजने वन परिक्षेत्र अधिकारी वणी आहे.

त्यामुळे भालर जंगला नजिकच्या गावाला सतर्क राहण्याचा वनविभागाने ईशारा दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की,

काही दिवसा आधी भालर नजिक असलेल्या

कोळसा खानित एका वाघाचे दर्शन नुकतेच झाले होते. याची माहिती वनविभागाला मिळताच, वनविभागाने तातडीने पाऊल उचलून, उपाययोजना करायला सुरुवात केली होती. यामध्ये वन कर्मचारी यांनी गावोगावी जाऊन ,जनजागृती अभियान राबविण्यास सुरवात केली आहे . परंतु त्यांच्या या जनजागृतीला ग्रामीण जनता ,मनावर घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आणी वन कर्मचारी यांच्याशी वाद घालतांना दिसुन येत आहे. परंतु वाघाचा भालर,मंदर परिसरात असलेला वावर पाहता ..नागरिकांनी योग्य ते सहकार्य वनविभागाला करण्याचे आवाहन वन अधिकारी यांनी केले आहे.

हा वाघ नुकताच निलगिरीबनात असलेल्या तलावाजवळ आढळून आला असल्याचे वनविभागाचे अधिकारी सुनिल ताजने यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

वनविभागाडुन भालर – मंदर जंगलातील परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असुन ,

सध्या निलगिरीबन परिसरात वाघाचा वावर असल्याचे ट्रॅप कॅमेरा मध्ये आढळून आले असल्याचे ,वन विभागाकडुन बोलले जात आहे.

हा वाघ दर वर्षी भद्रावती जंगला कडुन ,भालर जंगलाकडे येत असतो.

परंतु या वाघोबाने यंदाजा मुक्काम वाढविल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे नागरिकांनी योग्य सहकार्य करावे ..असे वन विभागाकडून बोलले जात आहे.

गावातील लोकांनी जंगलात जाऊ नये , गुराखी यांनी जनावरे जंगलात घेऊन जाऊ नये ,आणी वनविभागाला योग्य सहकार्य करावे असे आवाहन सुनिल ताजने वन परिक्षेत्र अधिकारी वणी यांनी केले आहे

Copyright ©