महाराष्ट्र सामाजिक

*गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने कोरोना योद्धयांचा सन्मान*

 

 

पत्रकार शक्ती जिल्हा प्रतिनिधी

दिनेश भोजने – 7039352497

 

मुंबई ठाणे – प्रतिनिधी 19 डिसेंबर – गवळी सेवा फाऊंडेशनच्या वतीने कोरोना टाळेबंदीच्या काळात अन्नधान्य, औषध, बेघरांना अन्न, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याऱ्यां जवळपास शंभर कोरोना योद्धयांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम समाजसेवक नगरसेवक मा. एकनाथ भोईर साहेब व समाजसेवक मा.नगरसेवक मा. प्रदीप(भाई) खाडे साहेब यांच्या हस्ते गवळी सेवा फाऊंडेशन ठाणे सल्लागार सुरेश ठसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या वेळी संस्थेचे संस्थापक दिनेश भोजने, समाजसेविका सौ दिक्षाताई भोजने, समाजसेविका सौ उषाताई केंजले, स्वंयमसेविका सौ आस्था ठसाळ, समाजसेवक गणेश शेलार, नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ पाटील, धनंजय येंडे, महादेव बोरकर, दिलीप केंजले, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना काळात शहरात व्यवहार बंद झाले, लाखो लोकांचा रोजगाराअभावी चुल पेटली नाही. या कठीण काळात माणूसकी जपणारे समाजसेवक, समाजसेविका यांनी सामाजिक भान जपत मदतीला धावून आले. त्यांनी जातीपातीच्या भिंती ओलांडून मदत केली. उपचारासाठी रूग्णांना रुग्णालयातील अडचणींना सामोरे जावे लागले. स्वत:सह कुटुंबाचं जीव धोक्‍यात घालून जोखीम पत्करून समाजसेवक आणि समाजसेविका यांनी पुढाकार घेऊन जे कार्य केले ते प्रेरणादायी आहे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे कर्तव्य आहे असे मत संस्थेचे सल्लागार सुरेश ठसाळ यांनी व्यक्त केले.

यावेळी कोरोना योद्धा म्हणुन नगरसेवक एकनाथ भोईर, मा.नगरसेवक प्रदीप(भाई) खाडे समाजसेविका उषाताई केंजले, समाजसेवक गणेश शेलार, धनंजय येंडे, महादेव बोरकर, दिलीप केंजले यांच्या सहित जवळपास शंभर समाजसेवक व समाजसेविका यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वागळे इस्टेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम ढोले, पोलीस निरीक्षक वैशाली रासकर व इतर पोलीस बांधव यांना नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या हस्ते व वर्तक नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रताप येरूणकर, व इतर पोलीस बांधव यांना मा.नगरसेवक प्रदीप(भाई) खाडे साहेब यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आले.

यावेळी रवींद्र भोसले, गोविंद दिवेकर, मंगेश ठसाळ, महेश राणे, महेश काते, सोपान सूर्यवंशी, उत्तम खाडे, हनुमंत बोराडे, संकेत नवले, रोहित माने, मनीषा काते, रिया दिवेकर, सुनंदा ठसाळ, व स्वयंसेवक, स्वयंसेविका मोठया संख्येने उपस्थित होते.

 

सर्व समाजसेवक व समाजसेविकांनी गवळी सेवा फाउंडेशनचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शशिकांत ठसाळ व त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.

Copyright ©