यवतमाळ राजकीय

* अनामत रक्कम परत करा….मनसे*

कोरोनापूर्वी मार्च मध्ये ग्र अनामत रक्कम परत करा….मनसे

 

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप पाहता ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.परंतु ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक परिस्थितीअत्यंत वाईट आहे.कोरोना सुरू होण्या अगोदर ग्रामपंचायत निवणुकीची तयारी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत उमेदवारांनी नामनिर्देशन मूल्य भरले आहे सोबत इतर कागदपत्रे तयार करण्यासाठी हजारो रुपये खर्च केला आहे.फक्त चिन्ह वाटप बाकी असतांना कोरोनाचा लॉक डाऊन सुरू झाला.अश्या परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात परिस्थिती पाहता ज्या उमेदवारांनी कोरोना पूर्वी नामनिर्देशन मूल्य भरले आहे त्यांना या निवडणुकीत तोच खर्च पुन्हा न करता माफ करण्यात यावा अथवा त्याची भरलेली रक्कम त्यांना परत करण्यात यावी.या मागणीचे निवेदन मनसेने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले.

आज संपुर्ण महाराष्ट्रातून निवडणूक विभागाकडे करोडो रुपये जमा झाले आहेत.कोरोना काळात शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य नागरिक फार संकटात आहे.अश्या परिस्थिती शासनाने पुढाकार घेत या उमेदवारांची भरलेली रक्कम त्यांना परत द्यावी जेणे करून त्यांना नामनिर्देशन करण्यासाठी झालेला खर्च पुन्हा करण्याची गरज भासणार नाही.या प्रसंगी बोलताना अनिल हमदापुरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा विचार करता मनसेने या बाबतीत पुढाकार घेतला असून सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक परिस्थिती चा विचार शासनाने करावा असे मत व्यक्त केले

या निवेदनाद्वारे सर्व उमेदवारांची भरलेली रक्कम त्यांना परत द्यावी अथवा या निवडणुकीत त्यांना मोफत नामनिर्देशन दाखल करावे ही मागणी या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी केली.यात प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष

देवा शिवरामवार ,अनिल हमदापुरे

सचिन एलगंधेवार ,विकास पवार,

सादिक शेख,अमित बदनोरे,आकाश देशमुख, मुकुंद जोशी ,प्रशांत गौरकार यासह इतर मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Copyright ©