Breaking News यवतमाळ सामाजिक

*दबंग पी आय ची अवैद्य व्यावसायिकांच्या विरुध्य सुरू झाली पोलीस गिरी, त्यांची आता गय नाही!*

 

आर्णी

सतत सुरू असलेल्या अवैद्य व्यावसायिकांना आता आपला व्यवसाय बंदच करावा लागेल अन्यथा दबंग पी आय जाधव यांनी सुरू केलेल्या दबंग कार्यवाहीत सुटणार नाही कुणी हे आता प्रयंत झालेल्या कार्यवाही वरून दिसुन येत आहे

 

आर्णी तालुक्यातील मौजा नाईक नगर हेटी येथील शेत शिवारात मोहा फुलाची गावठी दारू मोठ्या प्रमाणात काढण्यात येत असल्याची गुप्त सूचना प्राप्त होताच आर्णी पोलीस स्टेशन चे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक मनोज चव्हाण व अक्षय ठाकरे यानी हेटी येथिल शेतशिवारात आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान धाड टाकली

या धाडी दरम्यान दोन प्लास्टिक च्या टाकी मध्ये १५० लिटर गावठी दारू साठा किंमत अंदाजे ९००० रुपये जप्त करून नष्ट करण्यात आला या प्रकरणातील आरोपी नामे उदयभान सूर्यभान राठोड वय 51 वर्ष रा नाईक नगर हेटी याचे वर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली

आर्णी पोलीस स्टेशन येथे ठाणेदार पितांबर जाधव रुजू झाल्या पासून सतत अवैध व्यावसायीक, रेती तस्कर,जुगार, मटका अवैद्य दारू विक्री यावर कार्यवाही करताना दिसून येत आहे.या सतत होणाऱ्या कार्यावाह्या मुळे अवैध व्यावसायीकांचे धाबे दणाणले असुन तर सर्वसामान्य जनता आनंद वेक्त करीत आहे,

Copyright ©