Breaking News यवतमाळ सामाजिक

*दोन मृत्युसह जिल्ह्यात 33 पॉझेटिव्ह*

*दोन मृत्युसह जिल्ह्यात 33 पॉझेटिव्ह*

+++++++++++++++
21 जण कोरोनामुक्त 33 पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 17 :
गत 24 तासात जिल्ह्यात 33 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये राळेगाव येथील 62 वर्षीय महिला आणि पांढरकवडा येथील 78 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 21 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 389 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 33 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 356 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 299 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12115 झाली आहे. 24 तासात 21 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11431 आहे. तर जिल्ह्यात एकूण 385 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 118404 नमुने पाठविले असून यापैकी 117832 प्राप्त तर 572 अप्राप्त आहेत. तसेच 105717 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Copyright ©