ICC ने महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं शेड्यूल जारी केलं असून 4 मार्च 2022 पासून ही स्पर्धा सुरु करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे एकूण सात सामने खेळवण्यात येणार आहेत.
मुंबई प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जारी केलं आहे. शेड्यूलनुसार, या स्पर्धेमध्ये एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना 4 मार्च, 2022 रोजी वेलिंगटनच्या बेसिन रिझर्व्हमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच या टुर्नामेंटमधील अंतिम सामना 3 एप्रिल, 2022 रोजी न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चच्या हेगली ओवल ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाबाबत माहिती दिली आहे.
Add Comment