*नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करा- आदित्य ठाकरे साहेब*
वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या धार्मिक कार्यक्रमाला शंभर भाविकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात यावी याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते व त्या उपोषणाची सांगता आमदार रणधीरजी सावरकर व आमदार गोपीकिशन जी बाजोरिया यांच्या हस्ते करण्यात आली व वारकर्यांच्या उपोषणला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरिता आमदार गोपीकिशनजी बाजोरिया यांनी गणेश महाराज शेटे व इतर महाराज मंडळींना मुंबई येथे विधान भवन मधे माननीय मुख्यमंत्री प्रत्यक्ष भेट घडून देण्याकरता बोलावले असता वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने शिष्टमंडळ मुंबई येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट करून देण्यात आली, असता गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला व वारकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असता वारकऱ्यांनी नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करावे आम्ही वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळाचा फार आदर करतो कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले त्यानंतर , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , पालकमंत्री बच्चुभाऊ कडू, आमदार रोहित दादा पवार, आमदार अमोल दादा मिटकरी, आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे ,आमदार गोवर्धन शर्मा , सुरेश महाराज बडे मुंबई , आमदार अनिल पाटील ,नगर सेवक हरेश केनी यांचा सत्कार करून निवेदन देण्यात आले वारकर्यांची मागणी लावून धरण्या करीता आमदार रणधीर जी सावकर यांनी विशेष प्रयत्न केले. परंतु त्यांनी पुढाकार घेऊन सहकार्याची भूमिका दाखवली विधान भवनामध्ये अनेक सन्माननीय आमदार साहेबांच्या भेटी झाल्या सोबत उपस्थित मान्यवर मंडळी विक्रम महाराज शेटे, तुकाराम महाराज भोसले, विलास महाराज कराड, राजेंद्र कोलट्टके साहेब उपस्थित होते
Add Comment