मुंबई प्रतिनिधी – १५ डिसेंबर – संपूर्ण महाराष्ट्रात गवळी समाजाच्या न्यायहक्कांसाठी कार्यरत असलेल्या गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून समाजाला अपेक्षित असे अत्यंत महत्वाचे योगदान तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने व एक जुटीने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. मी माझ्या समाजाला सर्वोत्तम समाज करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला जाणीव आहे आपला समाज आर्थिक, शैक्षणिक, शेतकरी म्हणून मागासलेला आहे मी प्रथमतः माझ्या समाजाला शैक्षणिक दृष्ट्या उच्चतम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपला समाज प्रगतशील होऊ शकतो. एकदा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गवळी सेवा फाऊंडेशन यांच्या मार्फत आर्थिक मदत देण्याचा मी माझ्या समाजाला प्रयत्न करणार आहे. तसेच सर्वच समाज बांधव शैक्षणिक दृष्टीने प्रगत असतील अस नाही पण आपल्या समाजाच्या दृष्टीने त्या समाज बांधवांना शेतीमध्ये प्रगतशील कसं करता येईल या दृष्टीने आपण प्रयन्त करणार आहोत. तसेच आपला समाज व्यवसायाकडे जास्त प्रमाणात वळत नाही पण आपण या गवळी सेवा फाऊंडेशन व गव्हरमेंडच्या अनुधानित योजनांचा आधार घेऊन वेगवेगळा व्यवसाय स्थापन करून देण्याचा प्रयत्न करून आपल्या समाजाला प्रगतशील मार्गावरती नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी स्वतः या फाऊंडेशनच्या मदतीने करण्याचा प्रयत्न करेन. तसेच आपल्या समाजातील आर्थिक मागास अशा व्यक्तींना किंवा गोरगरीब जनतेला जणआधार नसलेल्या वेक्तींना आर्थिक, सामाजिक मदत करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.समाजात असलेली समाज उपयोगी वेगवेगळी कार्यक्रम समाजासाठी वेळोवेळी राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच समाजातील इतर पोटजातींना आपण एकत्र करून आपला समाज योग्य मार्गाने कसा जाईल या दृष्टीने मी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत नवनिर्वाचित कोकण विभाग अध्यक्ष विलास खेडेकर यांनी वेक्त केले. व गवळी सेवा फाऊंडेशनचा मी आभारी आहे. तुम्ही दिलेली जबाबदारी विश्वासाने पूर्ण करेन असे ही यावेळी त्यांनी सांगितले.
त्यांचे एकनिष्ठ सामाजिक कार्य आणि समाजासाठी विकासासाठी असलेली तळमळ हे सर्व मुद्दे लक्षात धरून, विडिओ कॉन्फ्रेंस द्वारे बैठक दि.१४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न झाली यावेळी बंडुभाऊ बहाकर, सुरेश ठसाळ, विश्वनाथ पाटील, आत्माराम तटकरे, सागर पाटील, संदेश दर्गे, शशिकांत ठसाळ, राजेश चौकेकर, दिक्षाताई भोजने, आस्था ठसाळ, सारिका ठसाळ, वेदिका पाटील, शशिकला बिडकर, यांच्या सह कार्यकारणी सदस्य ऑनलाइन उपस्थित ही निवड करण्यात आली.
आजचे कोरोना काळातील वातावरण बघून गवळी सेवा फाऊंडेशनचे संस्थापक दिनेश भोजने यांच्या द्वारे ऑनलाइन व समक्ष विश्वनाथ पाटील यांच्या हस्थे नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
Add Comment