Breaking News

कोण बनणार ? तालुका अध्यक्ष !

 

आर्णी/शहर प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी आर्णी तालुका अध्यक्ष निवडीची प्रक्रिया आज यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री नितीन जी भूतडा यांच्या हस्ते पार पडली.
भारतीय जनता पार्टी आर्णी तालुका अध्यक्ष श्री विपीन उकंडराव राठोड राहणार बोरगाव यांची भारतीय जनता पार्टी आर्णी तालुका अध्यक्ष पदी दोबार निवड करण्यात आली.भाजपा आर्णी तालुका अध्यक्ष असताना तीन वर्षाच्या कार्यकाळात विपीन राठोड यांनी तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते,व जनतेशी नाळ जोडून ठेवली,सर्वा सोबत सलोख्याची वागणूक ,तत्परतेने जनतेला न्याय देण्याकरिता केलेले कार्य , समाजासाठी पुढे राहून केलेले अनेक समाजकार्य ,पार्टी वाढविण्या करीता कार्यकर्ते नोंदणी अभियान ,प्रत्येक गावात शाखा सुरू करणे, रस्त्यावर आंदोलन करणे या कामाची फलश्रुती म्हणून भारतीय जनता पार्टी ने विपीन राठोड यांच्यावर पुन्हा विश्वास ठेऊन आर्णी तालुका अध्यक्ष पदाची जवाबदारी दिली आहे.
विपीन राठोड यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून आपल्या निवडीचे श्रेय आपण कोणाला देता? असे पत्रकारशक्ती प्रतिनिधी रुपेश टाक आर्णी विपीन राठोड यांना विचारले असता,” माझ्या निवडी चे श्रेय देशाचे माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज भय्या अहिर,आमदार संदीपभाऊ धुर्वे,जिल्हा अध्यक्ष नितीनजी भुतडा,जेष्ठ नेते उद्धवरवजी येरमे,गोवर्धनजी राठोड,श्यामजी झळके तसेच भारतीय जनता पार्टी चे आर्णी तालुक्यातील समस्त पदाधिकारी,माझे कार्यकर्ते,माझे स्नेही मित्र, समस्त जनतेस देतो.” अशी प्रतिक्रिया दिली
विपीन राठोड यांच्या निवडी मुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.

Copyright ©