Breaking News यवतमाळ सामाजिक

अवैध वाळू तस्करीचे दोन ट्रॅक्टर पकडले. = वडकी पोलिसांची कारवाई.

प्रतीनीधी, यवतमाळ
नाल्याची वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे चोरटी वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर वडकी पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.हि कारवाई १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते सात वाजता दरम्यान करण्यात आली.
गजानन चंद्रभान जुनघरे रा.लाडकी,शुभम वामनराव लेनगुरे रा.धुमक चाचोरा व ओमप्रकाश ऊर्फ गोलू काटकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत वडकी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी येथील गोलु काटकर यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच २९. बी.सी. ६८८४ व नंबर नसलेला एक ट्रॅक्टर अशा दोन ट्रॅक्टरद्वारे खडकी परीसरातील नाल्याची वाळू उपसा करून त्या वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याच्या माहितीवरुन पोलीसांनी सापळा रचला व लाडकी गावाजवळून हे दोनही ट्रॅक्टर्स पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन जप्त केले.या कारवाईत जवळपास दहा लाख बारा हजार रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर्स व वाळू पोलिसांनी जप्त केली आहे.या प्रकरणी वडकी पोलिसांनी ट्रॅक्टर्स चालक व मालकाविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद केला आहे.या कारवाईतील तीनही जणांना राळेगाव येथील न्यायालयापुढे आज हजर करण्यात येणार असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी महसूल प्रशासनाकडे अहवाल सादर करण्यात येईल असे वडकीचे ठाणेदार जाधव यांनी सांगितले. ही कारवाई वडकीचे ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार गणेश मेशरे,किरण दासरवार,विजय बुरुजवाडे यांनी केली.या कारवाईमुळे परीसरातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर्स चालकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.
(फोटो सोबत)

Copyright ©