यवतमाळ सामाजिक

आर्णी पोलिसांची दबंग कारवाई आता होणार सगळे अवैध धंदे बंद

 

आर्णी ता,प्र- तालुक्यातील तेडोळी व बोरगाव येथील जुगारावार धाड मारून एकूण १, ९३, ७६० रुपयाचा मुद्देमालासह व ४ जुगारांना आर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले तेडोळी शिवारात एका शेताच्या धुऱ्यावर असलेल्या झाडाखाली काही इसम एक्का- बादशाह नावाचा जुगार खेळत असल्याची गुपीत माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या गुप्त माहितीवरून आर्णी पोलिसांनी धाड मारली यामध्ये उमेश राठोड, भोपीदास जाधव रा तेडोळी तर शेख सादिक शेख जाकीर रा अकोला बाजार यांची आंगझडती घेतली असता २७६९ रु नगदी मिळून आले व तीन दुचाकी वाहन अंदाजे कीं १ लाख ८५ हजार असे एकूण १,९२, २६० रु जप्त केले ही कारवाई पो हे का सतिष चौधार, विकास खंदारे, तुषार जाधव यानी केली. तसेच तालुक्यातील बोरगाव येथे कैलास जाधव हे गावातील चोकात वरली मटका चालवत असल्याची माहिती मिळताच पो का अक्षय ठाकरे, मनोज चव्हान व पवन चव्हान यांनी धाड टाकून त्या इसणाची अंगझडती घेतली असता १४७० रु मिळून आले. वरील कारवाही ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार करण्यात आली.

Copyright ©