यवतमाळ सामाजिक

उमरखेड तालुक्यातील १५० कोरोना योद्धयांचा सत्कार

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद व स्व . दिगंबरराव पसलवाड सेवाभावी संस्था चातारी यांच्या संयुक्त विद्यमाने

 

उमरखेड
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद व स्व . दिगंबरराव पसलवाड सेवाभावी संस्था चातारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिजाऊ भवन येथे दि .१२ डिसेंबर रोजी तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कोरोना योद्धयांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवांकित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा . डॉ . प्र . भा . काळे , तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे , भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा , ,पो .निरिक्षक संजय चौबे , प्रा .डॉ . अनिल काळबांडे ,स. पो. नि. संदिप गाडे , बळवंतराव नाईक , भाजप तालुकाध्यक्ष सुदर्शन रावते आदि मान्यवरांची उपस्थिती होती .जागतिक महामारी कोरोनाच्या दहशतीखाली संपूर्ण जग असतांना नागरिकांना आरोग्य , सुरक्षितता , स्वच्छता , यासह पत्रकारीतेच्या माध्यमातून संकटकाळात जिवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणाऱ्या घटकांचे मनोबल उंचावणाऱ्या पत्रकार , आरोग्य कर्मचारी , पोलीस , आशा वर्कर्स , अशा एकंदरीत १५० जनांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महामारी कोरोनाची भिती सर्वत्र पसरलेली असतांना आरोग्य विभाग व पोलीस विभागाच्या खांद्याला खांदा लाऊन सफाई कामगार, आशा वर्कर्स यांच्यासह पत्रकार वसंतराव देशमुख , निळकंठ धोबे,संतोष कलाणे, दत्तात्रय देशमुख,विलासराव चव्हाण यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानीत करण्यात आले . आपले कर्तव्य प्राणपणाने बजावणाऱ्या कोरोना योद्धयांचा यावेळी सन्मानपत्र व शिवचरित्र्यावरील पुस्तक देऊन सन्मानीत करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुधाकर लोमटे यांनी केले तर प्रास्तविक शिवाजी माने यांनी केले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माने , स्व . दि .पसलवाड सेवाभावी संस्थेचे सचिव भगाजी शिवरतवाड , प्रा . गणेश जाधव आदिनी अथक परिश्रम घेतले .

Copyright ©