शैक्षणिक

*मुख्याध्यापक पद हे काटेरी मुकुटा सारखेच* :- सुरेंद्र ताठे —-

मुख्याध्यापक पद हे काटेरी मुकुटा सारखेच :- सुरेंद्र ताठे —————- शिक्षकी पेशात काम करीत असतांना शाळेत जो आनंद मिळतो तो मुख्याध्यापक म्हणून मिळत नाही मुख्याध्यापक पद म्हणजे शाळेचे पालकत्व स्वीकारणे व घातलेला काटेरी मुकुट सांभाळणे होय. असे विचार न्युइंग्लिश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानीवृत्त मुख्याध्यापक सुरेंद्र ताठे यांनी व्यक्त केले . मुख्याध्यापक संघ तालुका राळेगांव यांच्या वतीने नेताजी विद्यालय राळेगांव येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ आजदिनांक १० शुक्रवार ला आयोजीत करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सोनामाता चहादं शाळेचे मुख्याध्यापक अनिल धोबे होते. सुरेंद्र ताठे सेवानिवृत्त मुख्याध्यापक न्युइंग्लिश हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगांव सारंगधर गावंडे  मुख्याध्यापक लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगांव अनुदानीत शाळा दहेगाव  मुख्याध्यापक रमेश उगे यांचा शाल श्रीफळ देऊन मुख्याध्यापक संघाकडून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय अतकरे मुख्याध्यापक धानोरा यांनी तर आभार प्रदर्शन दयालाल भोयर मुख्याध्यापक पौर्णिमा विद्यालय सावनेर यांनी केले .कार्यक्रमाला शेखर ओंकार  मुख्याध्यापक नेताजी विद्यालय राळेगांव ,खारकर  वरध, दोडके  सावरखेड,काळे  रिधोरा ,राजू रोहणकर उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Featured

Copyright ©