Breaking News

बोरिअरब येथे शिवसेनेतर्फे जाहीर निषेध*

शिवसेना बोरिअरब तर्फे रावसाहेब दानवे यांचा व पेट्रोल डिजेल दरवाढीचा जाहीर निषेध करण्यात आला. रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकऱ्यांचा आंदोलन हे पाकिस्तान आणि चीन पुरस्कृत आहे असे विधान केले होते , त्या निषेधार्थ आज सर्व शिवसैनिकांनी निषेध सभा शिवाजी चौक येथे घेतली. रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला चप्पल , जोडयांनी मारहाण करून निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक हजर होते. युवासेना, विद्यार्थी सेना शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला ,
उपतालुकाप्रमुख यवतमाळ विधानसभा डॉ.अनिल नाईक व नानाभाऊ राऊत यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकार व दानवेचा निषेध नोंदवला.

Copyright ©