यवतमाळ राजकीय

_डाॅ.महेश शहा यांनी अतिरिक्त शुल्क आकारलेल्या रुग्णांना पैसे परत करा ! राहुल गांधी विचार मंचची मागणी_*

*_डाॅ.महेश शहा यांनी अतिरिक्त शुल्क आकारलेल्या रुग्णांना पैसे परत करा ! राहुल गांधी विचार मंचची मागणी_*

*_जिल्हाधिकारी यांना राहुल गांधी विचार मंचच्या वतिने निवेदन सादर_*

यवतमाळ दि.११ डिसेंबर -: कोरोणा काळात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासनाच्या वतिने
शहरातील शासन मान्य खाजगी कोवीड उपचार केंद्र सुरु करण्यात आले.मात्र वाढत्या रुग्णसंख्येचा फायदा घेत डाॅ.शाह हॉस्पिटल यांच्या कोवीड केंद्रातून मोठ्या प्रमाणात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांन
कडुन अतिरिक्त शुल्क आकारण्यात आल्याने या विरोधात राहुल गांधी विचार मंचच्या वतिने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असुन ज्या रुग्णांकडुन अतिरिक्त शुल्क आकारले त्यांना ती रक्कम परत करण्यात यावी व प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यापुर्वी मयत सौ.मीरा प्रभुदास शिरभाते यांच्या उपचारा पोटी डॉ महेश शाह यांनी भरमसाठ बिल वसुल केले.ही रक्कम अतिरिक्त असून नियमानुसार नाही त्यामुळे त्यांनी शिरभाते यांच्या नातेवाईका कडून घेतलेली रक्कम परत करावी अशी तक्रार मृतकाची मुलगी युगंधरा प्रभुदास शिरभाते हिने केल्या नंतर तसेच प्रसार माध्यमांनी व कु.युगंधरा शिरभाते हिने वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर संबंधित तक्रारकर्तीला ६८७०० रु.एवढी रक्कम परत करण्यात आली मात्र यांच्या व्यतिरिक्त अनेकांना तक्रारी दाखल केल्या असुन त्यांना सुध्दा अतिरिक्त आकारण्यात आलेली रक्कम परत करण्यात यावी तसेच डाॅ.महेश शहा यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी राहुल गांधी विचार मंचच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा डाॅ.प्रा.मीनाक्षी सावळकर यांनी केली असुन मागणी पुर्ण न झाल्यास जन आंदोलन करण्याचा यावेळी ईशारा देण्यात आला.यावेळी निवेदन सादर करतांना महिला प्रदेशाध्यक्षा डाॅ.प्रा.मीनाक्षी सावळकर,महिला जिल्हाध्यक्षा प्रियंका बिडकर,शहराध्यक्ष सुकांत वंजारी,कार्याध्यक्ष किशोर कुळसंगे,आसिम अली,अजय किन्हीकर,
जिल्हा कार्याध्यक्ष अंजली चिलोरकर,विद्याताई मडावी,वर्षा मेश्राम, मनीषा तिरनकर संव,अभिलाष कोरडे,अमित बिहार, बाबा गवळी,सचिन नक्षणे,सुमित बिहाडे, मकरंद,मिना जाठप सोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©