Breaking News

ज्येष्ठ पत्रकार प्रदीप उर्फ पप्पूभाऊ येलमे यांचे निधन

यवतमाळ पत्रकार सृष्टीत गेल्या ३५ वर्षांपासून सक्रीय असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा दै.विदर्भ मतदारचे जिल्हा प्रतिनिधी प्रदीप उर्फ पप्पूभाऊ येलमे यांचे आज गुरुवारी, सायंकाळी ६.१० वाजता निधन झाले. ते गेल्या दहा दिवसांपासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा मोठा परिवार आहे. प्रदीप येलमे यांनी दै. विदर्भ मतदारकरिता पुसद, यवतमाळ, अमरावती, बुलठाना आदी ठिकाणी काम केले. त्यांच्या मार्गदर्शनााली अनेक पत्रकार घडवले तर अनेक पत्रकारांना त्यांच्या मदती करिता धावून आले तर वृत्तपत्र लिस्ट वर आणण्यास अनेकांना मदत केल्याचे उदाहरण आहे. त्यांना स्व. पी एल शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघा च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

Copyright ©