यवतमाळ सामाजिक

दुचाकीचा अपघात होऊन दादाराव घाटोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

घांटाजी येथुन राजेगाव येथे दुचाकी क्र. एम एच २९ झेड,४२३ ने परत जाताना रत्यावर खड्डा खोदून ठेवल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला राजेगाव येथील प्रतिष्ठित दादाराव फत्तुजी घाटोळ वय ५८ वर्ष हे गंभीर जखमी झाले त्याना यवतमाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना डॉक्टर नी सकाळी १०.२ मिनिटांनी मृत घोषित केले
दादाराव घाटोळ हे राजेगाव येथुन कामानिमित्त घांटाजी येथे आले होते त्या दरम्यान या मार्गावरील कोणत्याच प्रकारचा खड्डा खोदलेला नव्हता अचानक हा खड्डा खोदून ठेवला आणि कोणत्याही प्रकारचे सूचना फलकही लावण्यात आले नव्हते त्या मुळे हा खड्डा केल्याचे दिसलेच नसल्याने दुचाकी सरळ खड्ड्यात गेली यात घाटोळ यांचा मृत्यू झाला असून संबधित ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईक करीत आहे, दादाराव घाटोळ यांचे माघे एक मुलगा एक मुलगी असा आप्तपरिवार असुन त्याच्या मृत्यू ने सर्वत्र हळहळ वेक्त करण्यात येत आहे.

Copyright ©