यवतमाळ सामाजिक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आनोखे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात महादेव व नंदीबैलाला साकडे घालून केंद्र शासनाने मंजूर केलेले हे विधेयक शेतकरी हिताचे आहे अथवा नाही हे नंदीबैलाला प्रश्न विचारून आणोखे आंदोलन करून पाठिंबा दर्शविला आहे
– शेतकरी कृषी विषयक शेतकऱ्याचे जीवनाची राखरांगोळी करणारा असून या विधेयकाला कायदे रद्द करून केंद्र शासनाने दिल्लीतील लाखोच्या संख्येने असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांची संवाद साधून त्यांच्या मागणीला घेऊन जे शंका निर्माण झाली आहे त्याचं निरसन केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात यावे यासाठी आज दिनांक 8 12 2020 ला देशव्यापी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदच्या आव्हानाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून समर्थन व पाठिंबा देत आंदोलनाला आम्ही महाराष्ट्रातून महादेवाला व नंदीबैलाला साकडे घालून केंद्रशासन मंजूर केलेले हे विधेयक शेतकरी हिताचे आहे अथवा नाही हे नंदीबैला च्या माध्यमातून तमाम देशातील शेतकऱ्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मनीष भाऊ जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला नंदीबैलान स्पष्ट नकार दिलेला आहे या निमित्ताने केंद्र शासनाकडे आपल्या माध्यमातून मागणी करायची आहे की हे विधेयक शेतकरीविरोधी असल्याचा यावरुन स्पष्ट होतो की , एवढा प्रखर विरोध देशातील शेतकर्‍यांचा प्रचंड आक्रोश या विधेयकाच्या विरोधात निर्माण होत असताना केंद्र शासनाचे कर्तव्य आहे की या विधेयकाला घेऊन निर्माण झालेल्या संभ्रमाला दूर करणे व या आंदोलनाला जातीय व धार्मिक प्रांतिक तेड असा संदर्भ देऊन केंद्र शासनाने शेतकर्‍यांच्या आंदोलनाला बदनाम करू नये देशातील शेतकरी आता संघर्षासाठी उभा राहतोय यानिमित्ताने ही बाब या आंदोलनामध्ये अधोरेखित झाली असून या आंदोलनाच्या मागण्यासंदर्भात केंद्र शासनाने तातडीने सकारात्मक विचार करुन देशातील शेतकऱ्यांना शेतमालाला आधारभूत किंमत हमीभाव बाबत कायद्याने द्यावे व शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे या तिनही विधेयकामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक व्हावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मनीष भाऊ जाधव यांनी केली आहे .

Copyright ©