यवतमाळ सामाजिक

महाविकास आघाडीचा भारत बंद ला पाठींबा

 

कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी बांधवांच्या मनात संतापाची लाट आहे. याच लाटेतुनच देशभरातील शेतकरी संघटनांनी मंगळवारी दि.८ डिसेंबर रोजी देशव्यापी भारत बंद आंदोलन पुकारले होते. यालाच पाठिंबा म्हणून मंगळवारी दि.८ डिसेंबर रोजी  दिग्रस महाविकास आघाडीसह, प्रहार. बहुजन मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चाचे एकदिवसीय धरणे आंदोलन शिवाजी चौकात करण्यात आले. याला दिग्रस शहरातून प्रतिसाद मिळाला. भारत देशातील शेतकरी हे मागील १२ दिवसांपासून दिल्ली येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करित आहे. त्यांच्या न्याय मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, केंद्र सरकारने जे तीन विधेयक शेतकऱ्यांचा विरोध असतांना पारीत केले आहे ते विधेयक त्वरित रद्द करावे यासाठी दिग्रस काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करून भारत बंद ला पाठिंबा दर्शविण्यात आला. एकदिवसीय धरणे आंदोलनात महाविकास आघाडीसह प्रहार ,भारत किसान मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा यांच्यासह शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

Copyright ©