यवतमाळ सामाजिक

हीच ती टावर उभा करण्यासाठी आखलेली जागा

 टावर उभा कराल तर पाडुन टाकु, निवासी जनते ने दिला इशारा

यवतमाळ वडगाव लगत असलेल्या लक्ष्मण विहार, सह्याद्री नगर आणि मनी नगर वाशियानी या परिसरात खाजगी कंपनीचे टावर उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या पुर्वी याच संदर्भात जिल्हा अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी नगर परिषद याना निवेदाद्वारे टावर बाबत तक्रार करण्यात आली होती त्याची दखलही घेऊन टावरचे काम बंद केले खोदण्यात आलेला खड्डा हि बुजविण्यात आला परंतु पुन्हा टावर उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू असून सबंधित टावर धारका दादागिरी करून टावर उभारण्याचा प्रयत्न करीत आहे यात वाद होऊन कुणालाही दुखापत होऊ शकते याची संबधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्यांना समज देंने गरजेचे आहे अन्यथा होणाऱ्या परिणामाचा प्रशासन जबादार राहील आम्ही समस्त नागरिक टावर न होऊ देन्या करिता कोणत्याही स्तराला जाऊ कुणाचीही बळजबरी चालु देणार नाही असे सुभाष बिजनोर, सुरेश नेवारे मुरलीधर रेकलवार, सूरज मार्कंडे, नितीन जाधव, धनराज विलायतकर,अर्चना पारधी, विजय खांडेकर, इत्यादींनी या प्रकरणी निवेदन देण्यात आले.

Copyright ©